Sakal Auto Expo 2024 sakal
पुणे

Sakal Auto Expo 2024 : निवडा मनपसंत कार अन् बाइक;सकाळ ऑटो एक्स्पो उद्यापासून,एकाच ठिकाणी असंख्य पर्याय

आपल्या स्वप्नातील गाडी घरी यावी, असे प्रत्येक कुटुंबाला वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) भव्य ‘सकाळ ऑटो एक्स्पो २०२४’ आयोजित केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आपल्या स्वप्नातील गाडी घरी यावी, असे प्रत्येक कुटुंबाला वाटते. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६) भव्य ‘सकाळ ऑटो एक्स्पो २०२४’ आयोजित केला आहे.

चारचाकी किंवा दुचाकी घ्यायची म्हटल्यावर ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांची माहिती घ्यायची, बजेट जाणून घ्यायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत फिरावे लागते; पण या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळतात ते म्हणजे ‘सकाळ ऑटो एक्स्पो’मध्ये. तेव्हा खऱ्या अर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. या ठिकाणी विविध कार आणि बाइक यांची वैशिष्ट्ये, किमती आदींची माहिती मिळणार आहे. शिवाय इलेक्ट्रिक व्हेईकलचेही पर्याय असतील. गाड्यांची टेस्ट राइड घेण्याची संधी मिळणार आहे. कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे दोन दिवसांचा ऑटो एक्स्पो होणार आहे.

बजेट कार, सेडान, हॅचबॅक कार, एसयूव्ही, स्पोर्ट, इलेक्ट्रिक कार, ईव्ही बाइक आदी गाड्यांची माहिती मिळेल. एक्स्पोमध्ये वाहन उत्पादक कंपन्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ब्रँड असतील. त्यांची नवी मॉडेल, त्यावरील आकर्षक योजना आदींचा समावेश असेल.

एक्स्पोविषयी...

  • कधी : शनिवारी (ता. १५) व रविवारी (ता. १६)

  • कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • केव्हा : सकाळी १० ते रात्री ८

  • प्रवेश व पार्किंग मोफत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT