Sakal Auto Expo opening  sakal
पुणे

Sakal Auto Expo : वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; आज शेवटची संधी

वाहनांची खरेदी अधिक सोपी होण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने दोन दिवस ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वाहनांची खरेदी अधिक सोपी होण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने दोन दिवस ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन केले आहे. यात वाहनांचे विविध प्रकार उपलब्ध असून ग्राहकांना एकाच छताखाली सर्व माहिती मिळणार आहे. या एक्स्पोचे उद्‍घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते शनिवारी उत्साहात झाले. रविवारी (ता. १६) एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त जगदीश सातव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजिता रोकडे, बीयु भंडारीचे जनरल मॅनेजर अमोल सोमा, नमः शिवाय हीरोचे मॅनेजिंग डायरेक्टर शिव ओम, अरिहान सुझुकीचे सेल्स हेड मिलिंद बिरारी आदी उद्‍घाटनप्रसंगी उपस्थित होते. कर्वेनगरमधील डी. पी. रस्त्यावरील पंडित फार्ममध्ये या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्राहकांना कोणते वाहन खरेदी करावे, कोणत्या वाहनात कोणती वैशिष्ट्ये आहेत, असे अनेक प्रश्न पडतात. विविध शोरूममध्ये जाऊन माहिती मिळविण्यासाठी वेळ आणि पैसा खर्ची पडतो. मात्र, ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ग्राहकांना विविध कंपन्यांच्या चारचाकी आणि दुचाकींचे ब्रँड्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत.

या एक्स्पोमध्ये पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार, दुचाकींचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांना संबंधित शोरूम व्यावसायिकांकडून आर्थिक सवलतही दिली जाणार आहे.

सकाळच्या माध्यमातून नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सकाळ ऑटो एक्स्पोमुळे पुणेकर ग्राहकांची सोय होणार आहे. तसेच विविध कंपन्यांना येथे गाड्यांचे नवीन मॉडेल्स प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.

- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

पुणेकर हे चोखंदळ ग्राहक म्हणून ओळखले जातात. ‘सकाळ’ नेहमीच ऑटो एक्स्पो आयोजित करून यात सातत्य ठेवत आहे. येथे मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही नेहमीच आमचे सर्व ब्रँड्स घेऊन सहभाग नोंदवतो.

- अमोल सोमा, जनरल मॅनेजर-सेल्स, एमजी मोटर्स, बीयु भंडारी

सकाळ ऑटो एक्स्पोमुळे प्रत्येक ऑटो डीलरला अनेक ग्राहक मिळतात. नवीन प्रॉडक्ट्सची माहिती यानिमित्ताने मिळते. या एक्स्पोमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी आम्ही एक्सचेंज ऑफर ठेवलेली आहे.

- शिव ओम, मॅनेजिंग डायरेक्टर, नमः शिवाय हीरो, पुणे

सकाळ ऑटो एक्स्पोमध्ये आम्ही नेहमी सहभागी होत असतो. वेगवेगळ्या वयोगटांतील ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे फायदा होतो.

- मिलिंद बिरारी, सेल्स हेड, अरिहान सुझुकी

ग्राहकांसाठी सोपी गोष्ट होते म्हणजे वेगवेगळ्या ब्रँड्सच्या शोरूमला जाण्याऐवजी येथेच सर्व गाड्यांचा अनुभव घेऊ शकतो. ग्राहकांना समजतं की, त्यांची खरी गरज काय आहे.

- अनिकेत गारवे, मॅनेजिंग डायरेक्टर, गारवे स्कोडा अँड गारवे टाटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT