IMCC Students Sakal
पुणे

Sakal Karandak : ‘भन्नाट धाडस अन् मेहनतीमुळे मिळाले यश’; 'आयएमसीसी’च्या संघाची भावना

‘सकाळ करंडक स्पर्धेसाठी खास नवीन एकांकिका लिहावी, असा विचार डोक्यात घोळत होता. त्यावेळी इच्छामरणाचा एक विषय सुचला. त्याला आकार देऊन एकांकिका फुलवली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ करंडक स्पर्धेसाठी खास नवीन एकांकिका लिहावी, असा विचार डोक्यात घोळत होता. त्यावेळी इच्छामरणाचा एक विषय सुचला. त्याला आकार देऊन एकांकिका फुलवली; पण हा विषय ‘ब्लॅक कॉमेडी’ पद्धतीने मांडायचे धाडस करायचे ठरवले. हे भन्नाट धाडस आणि त्यावर घेतलेल्या मेहनतीनेच विजेतेपदाचा मुकूट पटकावू शकलो’, अशी भावना व्यक्त केली ‘आयएमसीसी’च्या विद्यार्थ्यांनी.

रविवारी झालेल्या सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड करिअर कोर्सेस (आयएमसीसी) महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले.

तसेच, त्यांच्या अथर्व जोशी व ओम चव्हाण या जोडगळीने सर्वोत्कृष्ट लेखन व दिग्दर्शन, ओम चव्हाण याने सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष, साक्षी परदेशी हिने सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री, उत्कर्ष दुधाने, शंतनू माने, मैथिली निकम यांनी सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि मधुरेश शहा याने सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना अशी तब्बल सहा वैयक्तिक पारितोषिके खिशात घातली.

आयएमसीसीने ‘जीना इसी का नाम है’ ही एकांकिका स्पर्धेत सादर केली. इच्छामरण हा विषय मांडताना त्यांनी समस्याग्रस्त व्यक्ती इच्छामरण किंवा आत्महत्येचा मार्ग पत्करतात; पण त्यांना वेळीच मदत मिळाल्यास त्यापासून परावृत्त करता येऊ शकते, असा संदेश दिला.

सुरुवातीला केवळ एका ओळीची संकल्पना सुचली होती. त्यानंतर आधी सादरीकरणातील बाबी सुचल्या आणि मग त्याला लेखनाच्या चौकटीत बांधले. इच्छामरण केंद्र, या काल्पनिक केंद्राभोवती एकांकिका फुलवली. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या बारकाव्यांवर आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला.

- अथर्व जोशी, लेखक-दिग्दर्शक

आम्ही निवडलेला विषय खूप गंभीर होता, पण तो हलक्याफुलक्या पद्धतीनेच मांडावा असे ठरवले होते. म्हणून ‘ब्लॅक कॉमेडी’ जॉनर निवडला. कलाकारांना प्रसंग द्यायचा आणि त्यांनी तो फुलवायचा, अशा उत्स्फूर्त पद्धतीने आम्ही ही एकांकिका बसवली. त्याचा खूप फायदा झाला. साठ वर्षांच्या एका कारकुनाची भूमिका करताना निरीक्षणातून ती फुलवली.

- ओम चव्हाण, लेखक-दिग्दर्शक

प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या व्यक्तिरेखेवर शून्यापासून काम केले. या एकांकिकेत मी लहान मुलीची भूमिका केली. पहिल्यांदाच आपल्यापेक्षा कमी वय असलेले पात्र मी साकारत होते. त्यामुळे लहान मुलांच्या प्रत्येक हालचालीचे बारकाईने निरीक्षण करून ते व्यक्तिरेखेत उतरवण्याचा प्रयत्न केला.

- साक्षी परदेशी, अभिनेत्री

मी गेल्या एक-दीड वर्षांपासून प्रकाशयोजना करत आहे. त्यात मला रसही निर्माण झाला. प्रकाशयोजनाकार म्हणून मी एकांकिकेत योगदान देण्यासाठी काय करू शकतो, याचा सतत विचार करत असे. त्यातूनच वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या. तांत्रिकदृष्ट्या पण काही वेगळे प्रयोग केले, त्याचे फळ मिळाले.

- मधुरेश शहा, प्रकाशयोजनाकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT