Sakal Khau Galli sakal
पुणे

Sakal Khau Galli : खाद्यसंस्कृतीचा अनोखा मिलाफ; पुणेकरांना घेता येणार विविध पदार्थांचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील खाद्यसंस्कृतीचा अनोखा मिलाफ खवय्यांना अनुभवता यावा यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ७ ते ९ जूनदरम्यान ‘सकाळ खाऊगल्ली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही खाऊगल्ली कर्वेनगरमधील राजाराम पुलाजवळ असलेल्या महालक्ष्मी लॉन्समध्ये भरविण्यात येणार आहे.

‘सकाळ’तर्फे खाऊगल्लीच्या सात यशस्वी पर्वांनंतर आता आठवे पर्व जाहीर करण्यात आले आहे. या खाऊगल्लीच्या निमित्ताने राज्यातील अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद नागरिकांना एकाच छताखाली घेता येणार आहे. तीन दिवसांचा हा कार्यक्रम खाद्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. याशिवाय गेमिंग झोन, लाइव्ह बँडदेखील खास आकर्षण आहे.

या खाऊगल्लीला जवळपास २५ हजारांहून अधिक नागरिक भेट देतात. सर्व वयोगटांतील नागरिक यात सहभागी होत असल्याने सेल्फी पॉइंट, लहान मुलांना खेळण्याची स्वतंत्र जागा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. महाराष्ट्रात दर कोसावर फक्त भाषाच नव्हे, तर खाण्यापिण्याचे पदार्थही बदलतात. असे बदलत असलेले अनेक खाद्यपदार्थ या खाऊगल्लीत असणार आहेत.

हे लक्षात ठेवा

  • कधी : ७, ८, ९ जून दरम्यान

  • वेळ : सकाळी ११ ते रात्री १०

  • कुठे : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर

व्यवसाय वृद्धीची संधी

‘सकाळ खाऊगल्ली’च्या सातव्या पर्वाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला होता. यात सहभागी झालेल्या सर्व व्यावसायिकांनाही फायदा झाला. पुणेकरांच्या मागणीवरून ही आगळीवेगळी खाद्यजत्रा पुन्हा एकदा होत आहे. त्यात किचन नॉन किचन स्टॉल आहेत.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क : ७९७२३ ६७७९६, ७७२२० ०१०९७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT