sakal vastu expo-2022 sakal
पुणे

उद्यापासून पुण्यात ‘सकाळ वास्तु एक्स्पो’

सकाळ वृत्तसेवा

पुणे महानगरातील सुमारे २०० प्रकल्पांमधील घरांचे पर्याय ‘सकाळ वास्तु एक्स्पो २०२२’ मध्ये ग्राहकांना पाहता येतील.

पुणे - कोरोना (Corona) संकटकाळात भासलेली हक्काच्या घराची (Home) जाणीव असेल वा अनेक वर्षांपासून थांबून राहिलेली घर खरेदीची इच्छा असेल, या दोन्ही गोष्टींचा ग्राहकांच्या (Customer) अंगाने विचार केला आता घरखरेदीचा निर्णय प्राधान्याने घेणे अगत्याचे ठरणार आहे. घरखरेदीसाठी इच्छुक असणाऱ्‍या अशा ग्राहकांसाठीच सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सकाळ वास्तु एक्स्पो २०२२’ (Sakal Vastu Expo-2022) पुण्यात (Pune) शनिवारपासून (ता. ३०) महालक्ष्मी लॉन (कर्वेनगर) येथे आयोजित करण्यात आला आहे. हा एक्स्पो दोन दिवस चालणार असून उन्हाची तीव्रता लक्षात घेता एक्सोचा संपूर्ण हॉल वातानुकूलित असणार आहे.

पुणे महानगरातील सुमारे २०० प्रकल्पांमधील घरांचे पर्याय इथे ग्राहकांना पाहता येतील. योग्य किमतीतील, हवे तेवढ्या मोठ्या घरांचे पर्याय या एक्स्पोच्या माध्यमातून इच्छुक घर खरेदीदारांना निवडता येणार आहेत.

एप्रिल महिन्यापासून राज्य शासनाने रेडी रेकनर दर व मेट्रो सेस सुरू लागू केला आहे. बांधकाम साहित्याचे दरही आवाक्याबाहेर जात आहेत. या सर्वांचा परिणाम येणाऱ्या काळात घरांच्या किमतीवर निश्चितपणे झालेला दिसेल. मात्र यात एक सकारात्मक गोष्ट अशी, नुकत्याच घेतलेल्या पत धोरण आढाव्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट दरात कोणताही बदल केला नसल्याने अद्यापही घरकर्जाचे व्याजदर स्थिर व आवाक्यात आहेत. या संधीचा लाभ घेत ग्राहकांनी तातडीने घरखरेदीचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.तुमच्या हक्काच्या घराची निवड करून हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ‘सकाळ वास्तु एक्स्पो २०२२’ चा लाभ घेण्याचे आवाहन सकाळ समूहातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ वास्तु एक्स्पो – पुणे

कधी : ३० एप्रिल व १ मे २०२२

कुठे : महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर, पुणे

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग : मोफत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

Salman khan Whatsapp Threat: "...तर सिद्दीकींपेक्षा वाईट हाल करू," सलमान खानला पुन्हा धमकी; व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमध्ये नक्की काय आहे?

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण : शिल्पकारानंतर पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या UP च्या वेल्डरला अटक

ISSF World Cup 2024: विवानला रौप्य, तर अनंतजीतला ब्राँझ; भारत चार पदकांसह नवव्या स्थानी

SCROLL FOR NEXT