Sakal Vastu Plotting Expo 2024 sakal
पुणे

Sakal Vastu Plotting Expo : प्लॉट, सेकंड होमच्या स्वप्नांची पूर्ती; आज शेवटची संधी

गर्द हिरव्यागार निसर्गात, पण शहराच्या जवळच आपल्या घरात काहीसे निवांत क्षण घालविण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - गर्द हिरव्यागार निसर्गात, पण शहराच्या जवळच आपल्या घरात काहीसे निवांत क्षण घालविण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. या स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा ‘सकाळ वास्तू प्लॉटिंग एक्स्पो’ मधून पूर्ण झाला आहे. शनिवारी (ता. २२) या ‘एक्स्पो’चे उद्‍घाटन झाले. कर्वे रस्त्यावरील सोनल हॉलमध्ये हे प्रदर्शन रविवारपर्यंत (ता. २३) सकाळी १० ते रात्री ८ दरम्यान खुले असणार आहे.

पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा पीएमपीएमएल पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते एक्स्पोचे उद्‍घाटन झाले. या वेळी अवनी लँड डेव्हलपर्सचे संस्थापक अनिल नाईक, फिनिक्स लँडमार्कचे संचालक व विश्वस्त सुनील राठोड, रिअल इस्टेट बँकिंग मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक शरद जेजुरकर, नंदन बिल्डकॉनचे कार्यकारी संचालक रोहन कोतकर, जागतिक बॅंक साहाय्यित स्मार्ट कृषी प्रकल्पाचे संप्रेषण तज्ज्ञ संग्राम जगताप, श्री डी अँड जी कॉर्पचे कार्यकारी संचालक प्रफुल्ल देशमुख, न्यूलीफ लाइफस्पेसचे संचालक अतुल जेठमलानी, पंचम डेव्हलपर्सचे भागीदार महेंद्र सुंदेचा-मुथा आदी मान्यवर उपस्थित होते.

एक्स्पोला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. आवड व बजेटनुसार २०हून अधिक विकसकांचे ५०हून अधिक प्लॉटिंग, सेकंड होम व जमिनीचे प्रकल्प या एक्स्पोमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांत सेकंड होम घेण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना एकाच छताखाली सर्व पर्याय पाहता यावेत आणि खरेदी करता यावी, या उद्देशाने हा एक्स्पो आयोजित केला आहे.

  • कधी - रविवार (ता. २३) जून

  • कुठे - सोनल हॉल, कर्वे रस्ता, पुणे

  • वेळ - सकाळी १० ते रात्री ८

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६४६ ७२४३१

  • पार्किंग व प्रवेश मोफत

देशभरात वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून पुणे नावाजलेले आहे. पायाभूत सुविधांमध्ये बांधकाम व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ‘सकाळ माध्यम समूह’ वेळोवेळी प्लॉटिंग एक्स्पोसारखे प्रदर्शन करून रहिवाशांसाठी व व्यावसायिकांसाठी संधी उपलब्ध करून देते. ‘सकाळ’च्या या आयोजनाला प्रतिसाद देऊन बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक यात सहभाग घेतात, ही एक अत्यंत जमेची बाजू आहे. असे प्रदर्शन नेहमी भरत राहिले तर बांधकाम क्षेत्रातील विकास वाढत राहील.

- डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे स्मार्ट सिटी तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल पुणे

‘सकाळ’ एक अशी संस्था आहे, जी वर्षानुवर्षे लोकांसाठी चांगल्या गोष्टी घेऊन येत असते. रेडी पजेशन असलेला ग्रीन मेडोज नावाचा प्रोजेक्ट रेनबो हाउसिंगच्या भागीदारीसमवेत पाचाने गावात आम्ही घेऊन आलो आहोत.

- रोहन कोतकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, नंदन बिल्डकॉन

प्लॉटिंगसाठी समर्पित असा एक्स्पो पुण्यात फक्त ‘सकाळ’तर्फे केला जातो. आमचे अनेक प्रकल्प पुण्यासह कोकणात सुद्धा पाहायला मिळतील. अनेक व्यावसायिक एकाच ठिकाणी येत असल्यामुळे व्यावसायिकांचा चांगला समुदाय एकत्र येतो.

- अतुल जेठमलानी, संचालक, न्यूलीफ लाइफस्पेस

‘सकाळ प्लॉटिंग एक्स्पो’ने आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. आम्ही गतवर्षीही भाग घेतला होता. या एक्स्पोमध्ये मोठ्या संख्येने चांगले ग्राहक येताना दिसतात. तळेगाव, वडगाव, चाकण या परिसरात आमचे प्रकल्प पाहायला मिळतील.

- आनंद नाईकनवरे, हेड-बिझनेस प्रोसेस

कुठेही धावपळ न करता एकाच छताखाली अनेक पर्याय पाहण्याची संधी मिळते. ‘सकाळ’ने हे प्रदर्शन भरवल्यामुळे एक विश्वासार्हता असते. मी ज्या अपेक्षेने इथे आलो होतो, त्याबदल्यात अत्यंत समाधानी प्रकल्प मला पाहायला मिळाले.

- कैलास बिरामणे, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT