Vidhansabha election 
पुणे

Vidhansabha Election : ‘सप’ विधानसभेच्या ३५ जागा लढविणार

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान ३५ जागा लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या मुंबईत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान ३५ जागा लढविण्याचा निर्णय समाजवादी पक्षाच्या मुंबईत झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात किमान ३५ जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे राज्य पदाधिकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष व विविध आघाड्यांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक मुंबईतील कार्यालयात झाली. या वेळी पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर, परवेझ सिद्दिकी, डॉ. अब्दुल राऊफ, डॉ. विलास सूरकर आदी उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नक्कीच सत्तापालट घडेल, असा विश्वास राज्य कार्यकारिणीने व्यक्त केला. त्याचबरोबर पक्षाचे प्रभावक्षेत्र असलेल्या ३५ मतदारसंघांमध्ये लढण्याबाबत प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असे पक्षातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, महावितरण कंपनी आणि राज्य सरकारच्या प्रीपेड मीटरच्या निर्णयाच्या विरोधात दोन जुलै रोजी जिल्ह्यांच्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT