pune metro Sakal
पुणे

मेट्रो! पुण्याचे नवे डेस्टिनेशन...

ऐन घाईच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून भयंकर मनस्ताप सहन करणाऱ्या पुणेकरांना पाच किलोमीटरचे अंतर पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करता आले तर? होय, पुणेकरांनी पाहिलेलं हे स्वप्न आज साकार होत आहे.

संभाजी पाटील @psambhajisakal

ऐन घाईच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून भयंकर मनस्ताप सहन करणाऱ्या पुणेकरांना पाच किलोमीटरचे अंतर पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करता आले तर? होय, पुणेकरांनी पाहिलेलं हे स्वप्न आज साकार होत आहे.

ऐन घाईच्या वेळी वाहतूक कोंडीत अडकून भयंकर मनस्ताप सहन करणाऱ्या पुणेकरांना पाच किलोमीटरचे अंतर पंधरा मिनिटांपेक्षा कमी वेळेत पार करता आले तर? होय, पुणेकरांनी पाहिलेलं हे स्वप्न आज साकार होत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरात प्रत्यक्षात मेट्रो धावत आहे. मेट्रोमुळे पुण्यातील केवळ वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल असे नाही तर या शहराचा वेग, विकासाच्या संधी आणि जीवनशैलीही बदलणार आहे.

एखाद्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी आहे, त्यावरून त्या शहराच्या प्रगतीचा वेग काय असेल हे लक्षात येते. पुण्यात सर्वांत कळीचा मुद्दा काय म्हटले की, वाहतूक कोंडी हेच उत्तर येते. पण त्यातून मार्ग काढण्यासाठीचा सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक पर्याय मेट्रोच्या रूपाने उपलब्ध झाला आहे, ही समाधानाची बाब आहे. जगातील हाँगकाँग, शांघाय, न्यूयॉर्क, बीजिंग, मेक्सिको, लंडन, मॉस्को, सेऊल, दुबई, दोहा अशा प्रगत शहरात मेट्रोचे जाळे आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, रशिया या देशांमध्ये मेट्रो असलेल्या शहरांची संख्या मोठी आहे. मेट्रोचे जाळे विस्तारले गेले तसे या शहरांच्या विकासाचा वेगही वाढला. पुण्यासोबत प्रक्रिया सुरू झालेली नागपूर मेट्रो २०१९ मध्ये सुरू झाली. पुण्यात २०१६ मध्ये मेट्रोच्या उभारणीला सुरवात होऊन आज ती प्रत्यक्षात धावणार आहे. मेट्रो सुरू होणे ही त्या शहराच्या दृष्टीने खरोखरीच दोन पावलं पुढे टाकणारी बाब आहे.

विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक व क्रीडानगरी आणि जगातील एक महत्त्वाचे आयटी शहर अशी पुण्याची ओळख आहे. आयटी, वाहन उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास जसजसा होत गेला तसतसे शहराचे स्वरूप बदलले. शहराचा विस्तार चारही बाजूंनी झाला. पण शहराची गती राखणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था त्या तुलनेत सुधारली नाही. उलट ती आणखीच डबघाईस आली. त्यामुळेच शहरातील खासगी वाहनांची संख्या वाढली. वाहने वाढल्याने सहाजिकच रस्त्यावरील ताण वाढला. ‘सकाळ’ने हाच प्रश्न उपस्थित करून ‘पुणे बस डे’ च्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारल्यास रस्त्यावरील खासगी वाहने, प्रदूषण, अपघात कमी होतात हे प्रयोगातून दाखवून दिले. पण यंत्रणांनी हा प्रयोग गांभीर्याने घेतला नाही, पर्यायाने शहरातील वाहतूक व्यवस्था जास्तच बिघडत गेली. आज हडपसर, नगररस्ता, सिंहगड रस्ता, विद्यापीठ चौक आदी शहराची प्रवेशद्वारे वाहतूक कोंडीची केंद्र बनली आहेत. त्याचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होत आहे ही आशादायक आणि पुणेकरांसाठी सुखावह बाब आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांना जोडत ३४ किलोमीटरचा पहिला टप्पा मेट्रोने हाती घेतला आहे. त्यापैकी पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी हा सात किलोमीटरचा तर वनाज ते गरवारे कॉलेज हा पाच किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते आणि आज उद्‌घाटनही होत आहे. स्वतः पंतप्रधानांनीच या प्रकल्पात लक्ष घातल्याने मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पासाठी त्यांची मदत होईल. त्यादृष्टीनेही मोदी यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. उरलेल्या मार्गाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा महामेट्रोने केली आहे. ज्या टप्प्यात मेट्रो सुरू होत आहे, तो वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक वर्दळीचा असणारा मार्ग आहे. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्याचा किती फायदा होतो याचाही अंदाज येईल. पुणेकरांना स्वतःच्या टू व्हीलरवरून सर्वत्र फिरण्याची सवय लागली आहे. ही सवय मोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी मेट्रोपर्यंत जाणाऱ्या वाहनांची साखळी तयार करावी लागेल. मेट्रो स्टेशनजवळ पार्किंग, सायकल, मेट्रोतून उतरल्यानंतर पीएमपी बसची उपलब्धता या गोष्टी कराव्या लागतील.

पुण्याचे वाढलेले क्षेत्रफळ, पीएमआरडीए क्षेत्राचा होणारा विकास लक्षात घेता मेट्रोचा विस्तारित दुसरा टप्पा तातडीने हाती घ्यावा लागेल. स्वारगेट ते कात्रज, स्वारगेट ते सिंहगड रस्ता, कात्रज ते उरुळी, स्वारगेट ते हडपसर आणि पुढे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे मेट्रोचे जाळे उभारले गेले तरच त्याचा वाहतुकीच्या दृष्टीने एकत्रित परिणाम दिसणार आहेत. मेट्रोमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन्ही शहरे आणखी जवळ आली आहेत त्यामुळे यापुढच्या विकासप्रकल्पांचा एकत्रित विचार व्हायला हवा. मेट्रोने पुण्यात जान भरली आहे हे नक्की.

हे नक्की करा...

  • मेट्रो स्टेशनपर्यंत सहज पोचण्यासाठी कनेक्टिव्हटी

  • विस्तारित मार्गांचे काम तातडीने हाती घ्यावे

  • सार्वजनिक वाहतुकीचे इतर पर्याय सक्षम करणे

  • मेट्रोत बसण्याची मानसिकता तयार करणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT