Sea Beach Sakal
पुणे

स्वयंशिस्तच वाचवेल आपले प्राण!

पर्यटन म्हणजे फक्त दंगा, मस्ती, सेल्फी अशी काहीशी समजूत झाल्याने फिरायला गेल्यानंतर बाळगायच्या सुरक्षेकडे सध्या दुर्लक्ष होताना दिसते.

संभाजी पाटील @psambhajisakal

पर्यटन म्हणजे फक्त दंगा, मस्ती, सेल्फी अशी काहीशी समजूत झाल्याने फिरायला गेल्यानंतर बाळगायच्या सुरक्षेकडे सध्या दुर्लक्ष होताना दिसते.

पर्यटन म्हणजे फक्त दंगा, मस्ती, सेल्फी अशी काहीशी समजूत झाल्याने फिरायला गेल्यानंतर बाळगायच्या सुरक्षेकडे सध्या दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे पर्यटनाच्या आनंदापेक्षा अपघात वाढू लागले आहेत. धरण, समुद्रकिनारे, शेततळ्यांत उतरताना योग्य काळजी घ्यायलाच हवी, त्यासाठी राज्य सरकारलाही काही पावले उचलावी लागतील.

पाणी दिसले की त्यात डुबकी मारण्याचा मोह आवरता येत नाही. पण पाण्याचा, त्या जागेचा अंदाज न घेता किंवा मोबाईलवर सेल्फी घेण्याच्या नादात पाण्यात उतरल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. यात अपघातापेक्षाही मानवी चुकांचे प्रमाण जास्त असल्याचे अशा घटनांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. १९ मे रोजी भाटघर धरणात पाच महिला बुडाल्या. याच दिवशी चासकमान धरणाच्या जलाशयात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दोन्ही घटना अतिशय दुःखदायक आहेत. यामध्ये पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा योग्य ती सुरक्षा न घेतल्याने जीव गमवावे लागले. भाटघर धरणातील अपघात सेल्फी काढण्याच्या नादात झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे यापुढील काळाततरी असे अपघात रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. गेल्या महिनाभरात राज्यभरात धरण, तलाव, समुद्रकाठी तसेच शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्यांची संख्या २५ च्या वर आहे.

जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे अंघोळीला गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील कोंडिवली धरणाच्या पाण्यात सेल्फी घेण्यासाठी उतरलेला पुतण्या पाण्यात घसरून पडला त्याला वाचविण्यासाठी उतरलेल्या काकाचाही मृत्यू झाला. मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणाऱ्या दोन महिला नर्मदा नदीत सेल्फी घेताना बुडाल्या. अमरावती जिल्ह्यात कुष्टा गावात शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. हे दोघे शेततळ्यावर व्हीडिओ तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट करीत असत. आनंद किंवा मजा घेत असताना योग्य ती काळजी घ्यायलाच हवी, एवढेच या घटनांमधून दिसून येते.

उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही पर्यटक मोठ्या प्रमाणावर धरणांच्या परिसरात पर्यटनासाठी जात असतात. तेथे गेल्यानंतर पाण्यात उतरल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. त्यातच वेगळ्या पोझमधील सेल्फी हवा असल्याने पाण्याचा, खोलीचा, अंतर्गत प्रवाहांचा, पाण्यात असणाऱ्या गाळाचा अंदाज न घेता पाण्यात उतरले जाते. ज्यांना पोहता येत नाही असेही पाण्यात उतरतात आणि दुर्घटना होते. पुणे जिल्ह्यात धरणांची संख्या मोठी आहे. बहुतेक धरण क्षेत्रांत पाण्यात उतरण्यास बंदी घातली आहे. तरीही पर्यटक सर्रास पाण्यात उतरतात. खडकवासला धरणाच्या सर्व बाजूंनी लोक पाण्यात उतरताना दिसतात. अशा हौशी लोकांना अडविण्याची कोणतीही व्यवस्था सध्यातरी दिसत नाही.

सध्या पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. पण चांगली पर्यटन संस्कृती मात्र तयार झालेली दिसत नाही. पर्यटनाला जाताना त्या ठिकाणचे पावित्र्य राखण्यापासून वाहनांचे पार्किंग कसे करावे, कचरा कुठे टाकावा, परदेशी पर्यटक दिसले तर झालेला आनंद कसा व्यक्त करावा. त्याठिकाणी दिलेल्या सूचनांचे पालन कसे करावे, हे शिकण्याची आणि शिकवण्याची गरज आहे. बेधुंद वागल्यास तत्काळ कडक कारवाई होते हा संदेशही जायला हवा. त्यामुळे राज्य सरकारने पर्यटनस्थळांच्या सुरक्षेसोबत सर्वांना आनंद घेता येईल यासाठी काही नियमावली, मार्गदर्शक सूचना तयार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी.

हे नक्की करा

  • धरण, तलावांच्या परिसरात गस्तीपथके नेमावीत.

  • धोकादायक ठिकाणी उतरण्यास बंदी करावी.

  • पर्यटकांसाठी स्थळनिहाय नियमावली बनवावी.

पर्यटनाचा आनंद घेणे विसरलो...

मुळात सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी पर्यटनाचा आनंद घेणेच आपण विसरलो आहोत. सेल्फीचा नाद फक्त तरुणाईलाच आहे असे नाही, आता प्रत्येकाला सोशल मीडियासाठी आपली वेगळी छबी टिपायची असते. हे वेगळेपण टिपण्याच्या नादात अपघात होतात. त्यामुळे फिरायला जाताना स्वतःच काही नियम घालून घेणे आवश्यक आहे. दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून पाण्यात उतरणे, कड्याच्या टोकावर उभे राहून सेल्फी काढणे टाळल्यास धोकाही टळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT