गुडघा दुखावला तरी मारली बाजी, संग्राम दुसऱ्यांदा ‘आयर्नमॅन’  sakal
पुणे

गुडघा दुखावला तरी मारली बाजी, संग्राम दुसऱ्यांदा ‘आयर्नमॅन’

लोणी भापकरसारख्या सततच्या दुष्काळी पट्ट्यात वाढलेला संग्राम बारवकर अमेरिकेतील लॉस एंजल्समध्ये सध्या हेल्थकेअर कंपनीत ‘बिझनेस अॅनालिस्ट’ म्हणून नोकरी करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : लोणी भापकर (ता. बारामती) येथील संग्राम दत्तात्रेय बारवकर या तरुणाने अमेरिकेत ‘आयर्न मॅन’ किताब पटकावला आहे. त्याने ओरेगॉन राज्यात झालेल्या ‘आयर्नमॅन वर्ल्ड चँपियनशिप' स्पर्धेत यश मिळविले असून हा किताब त्याने दुसऱ्यांदा पटकावला आहे. स्पर्धेदरम्यान सायकल नादुरूस्त होऊन गुडघा दुखावल्यानंतरही त्याने मिळविलेले हे यश कौतुकास्पद ठरले आहे. (sangram barvkar Success Ironman World Championships)

लोणी भापकरसारख्या सततच्या दुष्काळी पट्ट्यात वाढलेला संग्राम बारवकर अमेरिकेतील लॉस एंजल्समध्ये सध्या हेल्थकेअर कंपनीत ‘बिझनेस अॅनालिस्ट’ म्हणून नोकरी करत आहेत. लोणी भापकरमधील न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाचे व विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे ते विद्यार्थी होते. पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत घेतले आणि नोकरीही तेथेच करत आहेत. कणखरपणाचा गुण शाळेतून आणि गावातून घेतल्याचा संग्राम यांना उपयोग झाला. सन २०१७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आयर्नमॅन किताब पटकावला होता. ओरेगॉन राज्यातील सालेम येथे ‘आयर्न मॅन 70.3 ओरेगॉन’ ही स्पर्धा जाहीर झाली होती.

संग्राम यांनी तीन आठवडे अपार मेहनत घेतली. सोमवारी दहा मैल धावणे, मंगळवारी प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेणे, बुधवारी चार किलोमीटर पोहणे, गुरुवारी दोन तास सायकल चालविणे, शुक्रवारी तीन मैल धावणे आणि शनिवारी टेकडी चढणे असा सराव केला. नुकतीच ओरेगॉन येथे पार पडलेल्या स्पर्धेत विलॅमेट्टी नदीमध्ये त्यांनी १.९ किलोमीटर अंतर तेहतीस मिनिटात पूर्ण केले. त्यानंतर ९० किलोमीटर सायकलींग ३ तास ५५ मिनिटात तर मिंटो ब्राऊन पार्कमध्ये २१ किलोमीटर धावण्याची स्पर्धा २ तास ३५ मिनिटात पूर्ण केली. एकूण ७ तास २० मिनिटांमध्ये ११३ किलोमीटरचा पल्ला पूर्ण केल्याने संग्रामला आयर्न मॅन किताबाने गौरविण्यात आले. जगभरातून तीन हजारांपेक्षा अधिक स्पर्धेत सहभागी झाले होते. यामधून आयर्न मॅन किताब पटकावणारे एकूण चार भारतीय आहेत.

न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक संदीप जगताप म्हणाले, ‘‘प्रतिकूलतेतूनच परिसरात अनेक खेळाडू तयार झाले आहेत. आमच्या विद्यालयाचे शिक्षक डी. ई. बारवकर यांचे चिरंजीव संग्राम बारवकर हेही त्यापैकी एक असून परिसराला आणि शाळेला त्यांचा अभिमान आहे.’’

स्पर्धेदरम्यान अनेक अडथळे आले. सायकल थोडी नादुरुस्त झाली होती, तसेच गुडघ्यातून वेदना निघू लागल्या. स्पर्धेतून बाहेर पडण्याचा विचारही मनात आला. परंतु, जिद्दीने उरलेला टास्क पूर्ण केला.

-संग्राम बारवकर, आयर्नमॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT