पुणे : 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुण्यात आहे. बाळासाहेबांच्या वेळी केंद्रबिंदू मुंबईत होता. ठाकरे सरकार स्वबळावरच आहे. स्वबळ होतं म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो' असे स्पष्ट मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी आज (ता.31) संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
- 'पदवीधर'साठी भाजपचे महानोंदणी अभियान; अडीच हजार कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर
हिंदुत्त्वाबद्दल बोलताना ते म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्त्व राजकीय नाही. राजकारणासाठी शिवसेनेने हिंदुत्त्वाचा कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपणे हिंदुत्त्वाची भूमिका मांडते. सरकारसमोर आव्हान निर्माण करणे विरोधकांचा अजेंडा असे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
'विरोधी पक्षाने संघाचं हिंदुत्त्व शिकावं. केद्र, राज्यातील विरोधकांनी हिंदुत्त्व सरसंघचालकांकडून शिकावं. घंटा वाजवल्या, शेंडी- जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्त्व नाही' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
ठाकरे सराकरवर होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, ''ठाकरे सरकार पडणार यावर अनेकांनी पैजा लावल्या आहेत. मात्र, ठाकरे सरकार 5 वर्षे चालणार आहे. पुढील महिन्यात आघाडी सरकारची वर्षपूर्ती होईल.'
- पुण्यात घडली किळसवाणी घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
संभाजीराजेंना पंतप्रधान वेळ का देत नाहीत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले, 'मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आमची भावना आहे. संभाजीराजेंना चर्चेसाठी पंतप्रधान वेळ का देत नाही?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
सध्या बिहार निवडणुकांकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
- काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.