Sant Tukaram Maharaj Palhi Sohala sakal
पुणे

Ashadhi Wari : भक्तिसागरासाठी पुणेकर सज्ज

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा, तुकोबां’चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर उद्या (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - टाळ-मृदंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा, तुकोबां’चे स्मरण करत पंढरीच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांचा भक्तिसागर उद्या (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांनी जय्यत तयारी केली आहे. पुणे महापालिका प्रशासनातर्फे निर्मल वारीसाठी २४ तास स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. वारकऱ्यांना आरोग्य सुविधा, पाणी, निवासाची व्यवस्था आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीतून, तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाले आहे. या दोन्ही संतांचे पालखी सोहळे पुण्यात एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांसह परिसरातील उपनगरांमधून भाविकांची अलोट गर्दी होते. शहरात दोन दिवस लाखो वारकऱ्यांचा मुक्काम असणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनातर्फे वारीची तयारी सुरू होती.

एक हजार ६९५ स्वच्छतागृहे

महापालिकेची शहरात अनेक भागांत सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत, पण वारीच्या काळात ती कमी पडतात, त्यामुळे महापालिकेने १ हजार ६९५ मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. पालखी मार्गासह मुक्कामाच्या ठिकाणी ही फिरती स्वच्छतागृहे ठेवली गेली आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT