Sant Tukaram Maharaj palkhi route problem loni kalbhor 20 june 2022 palkhi Departure sakal
पुणे

पालखी मार्गावर संत तुकाराम महाराज भक्तांची वाट खडतरच...!

हवेलीतील लोणी काळभोरसह परिसरातील पुर्वीच्या अडचणी जैसे थे असल्याने त्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापुर्वी सुटणार का?

जनार्दन दांडगे.

लोणी काळभोर : तब्बल दोन वर्षांनी वैष्णवांचा मेळा लोणी काळभोर परिसरात येत आहे. मात्र, पूर्व हवेलीतील लोणी काळभोरसह परिसरातील पुर्वीच्या अडचणी जैसे थे असल्याने त्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यापुर्वी सुटणार का? याही वर्षी प्रवास खडतरच होणार असा प्रश्न लोणी काळभोरसह परिसरातील नागरिकांना पडला आहे. मागिल दोन वर्षे कोरोना महामारीमुळे पायी पालखी सोहळा झाला नाही. मात्र, यावर्षी कोरोनाचा ज्वर कमी झाल्यामुळे पालखी सोहळा होणार असल्याने वारकऱ्यांची लगबग सुरू झाली असून, मोठ्या प्रमाणावर वारकरी समाज सोहळ्यात सहभागी होणार आहे. २० जून, २०२२ रोजी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरातील पुणे-सोलापूर महामार्गाच्या बाजूला ठिकठीकाणी वाढती अतिक्रमणे, साईडपट्ट्या उखडलेल्या असून, बेशिस्त पार्किंगमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे यावर्षीही संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याची वाट बिकटच ठरणार आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला पालखी मार्गावरील झाडे काढणे, तळावरील झाडे झुडपे काढून मैदान स्वच्छ करणे, सपाटीकरण करणे, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा, आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच पालखी मार्गात कोणत्याही अडीअडचणींचा सामना वारकऱ्यांना करावा लागू नये अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात आजूनही या मार्गावर काम हाती घेण्यात आले नाही किंवा साधी डागडुजीहि दिसून येत नाही.

शुक्रवारी (ता. २४) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथे येत आहे. टोलवसूलीच्या काळात महामार्गाची दुरूस्ती, देखभाल होत होती. त्यानंतरच्या काळात मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वारक-यांना अनेक समस्यांना समोर जावं लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण महामार्गावर दुतर्फा काटेरी झुडुपे, माती व वाळूचे साम्राज्य पसरले आहे. दुचाकीस्वारांचा धडकून किंवा घसरून अपघात होवून गंभीर जखमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्या मध्ये एक लोखंडी जाळ्या टाकण्यात आल्या होत्या. परंतु हळूहळू त्या गायब झाल्या. त्या परत टाकण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्या मध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फूटपाथ तयार करण्यात आला. जाळ्यांची चोरी व्हायला लागली तसेच त्यामुळे खालचा फूटपाथही आपोआपच तुटला आहे. याची दुरूस्ती करण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही.

सदर महामार्गाचा ताबा कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केला. तत्पूर्वी कंपनीने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावरील जाळ्या पुन्हा बसवल्या परंतू ब-याच ठिकाणच्या जाळया अवघ्या काही दिवसांत गायब झाल्या आहेत. तुटलेले लोखंडी ॲगल पदपथावर येत असल्याने ते धोकादायक ठरत आहेत. याचबरोबर टोल बंद झाला तरी आजतागायत दोन्ही टोलनाक्यावर टोल वसूली करण्यासाठी उभारण्यात आलेले बुथ जैसे थे आहेत. तसेच स्पिडब्रेकर काढण्यात आलेले नाहीत.या दोन्ही ठिकाणची विद्य्यूत व्यवस्था खंडित करण्यात आल्याने वाहनचालकाला याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहण आदळून नुकसान होते. यामुळे हे बुथ व स्पिडब्रेकर तात्काळ काढून टाकावेत या मागणीने जोर धरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT