sarola pande indo africa paper mills caught fire Sakal
पुणे

Nasrapur Fire Accident : सारोळा-पांडे येथील इंडो-आफ्रीका पेपर मिल्स कंपनी मध्ये आग

किरण भदे

नसरापूर : सारोळा येथील पांडे गावाजवळ इंडो आफ्रीका पेपर मिल मध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आग लागली असुन आगी मध्ये कच्चा माल असलेल्या पुठ्ठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे कंपनीच्या अधिकारयांनी माहीती देतान सांगितले.

पेपर मिल पेपर तयार करण्याचे काम केले जाते दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या बाँयलर पासुन थोड्या अंतरावर असलेल्या कच्च्या मालाच्या गोदामाला अचानक आग लागली या आगी मध्ये पेपर बनवण्यासाठी लागणारया पुठ्ठ्याचे मोठे नुकसान झाले आहे आग लागलेली समजताच राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी नाना मदने व गव्हाणे घटनास्थळी दाखल झाले.

कंपनीचे अधिकारी व पोलिसांनी मिळुन खंडाळा तालुक्यातील गोदरेज कंपनीचा व एसेन्ट कंपनीची अग्निशामक गाडी व भोर नगरपरिषदेचे आग्निशामक गाडी तातडीने बोलावण्यात आली या तीन अग्निशामक गाड्यांच्या माध्यमातुन दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास आग आटोक्या आली तो पर्यंत मोठ्या प्रमाणात पुठ्ठा जळुन गेला होता सुदैवाने या आगीत कोणीही कामगार व अन्य अधिकारी जखमी झाले नाहीत,

व जीवितहानी झाली नाही,कंपनी परिसरात आगीचे लोळ व धुरांचे लोट मोठ्या प्रमाणात दिसत होते कंपनी मध्ये लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजु शकले नाही परंतु कंपनीत जवळ असलेल्या बाँयलर मधील ठिणगी या ठिकाणी पडल्याने आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या बाबत सायंकाळ पर्यंत राजगड पोलिस ठाण्यात नोंद होईल अशी माहीती पोलिस कर्मचारयांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT