Startup Day esakal
पुणे

Startup : ‘स्टार्टअप’साठी ‘सारथी’ आहे साथीला; ‘सीओईपी’च्या माध्यमातून इनक्युबेशन योजनेची सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

Pune News : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) आता उद्योजकता विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील भाऊ इनक्युबेशन संस्थेमार्फत सरसेनापती संताजी घोरपडे ‘सारथी’ उद्योजकता विकास (इनक्युबेशन) योजना कार्यान्वित झाली आहे.

‘सारथी’चे अध्यक्ष अजित निंबाळकर आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, भाऊ इनक्युबेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोशी यावेळी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष निंबाळकर म्हणाले, ‘‘उपक्रमाची ही सुरुवात असून, पुढे जाऊन हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस आहे. तरी लक्षित गटातील विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.’’

सारथी पुणे विभागीय कार्यालयाचे उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार, संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प संचालक भि. यो. बिरादार, संशोधन अधिकारी अमर पाटील, संशोधन नवनाथ चव्हाण, संगणक सल्लागार किशोर ढोकरे,

भाऊ इनक्युबेटर्स सेंटरचे एजीएम गिरीश देगावकर, प्रशांत खरांगटे उपस्थित होते. उपक्रमामध्ये निवड झालेल्या आठ लाभार्थ्यांनी त्यांच्या ‘स्टार्टअप’विषयी सादरीकरण केले.

केंद्राविषयी थोडक्यात...

योजना कुणासाठी?

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या गटातील नवोदित तरुण विद्यार्थी किंवा नवीन उद्योजकांसाठी

कशी होणार निवड?

ज्यांच्याकडे व्यवसाय कल्पना आहे. त्याला अंतिम स्वरूप देऊन नवीन व्यवसायनिर्मिती करू शकेल अशा १० लाभार्थ्यांची निवड

अर्थसाहाय्य किती मिळणार?

एका वर्षासाठी २५ हजार रुपये प्रतिमहिना आर्थिक साहाय्य देणार

सुविधा काय मिळणार?

सारथी संस्थेने निवड केलेल्या नवीन उद्योजकांना भाऊ इनक्युबेटर्स सेंटरमध्ये एक वर्ष मार्गदर्शनासाठी पाठविले जाईल. केंद्रातील कार्यालयीन जागा, तंत्रज्ञान, प्रशासकीय साहाय्य सॉफ्टवेअर, मीटिंग हॉल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन अशा विविध बाबी उपलब्ध होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT