Dr Pallavi Saple 
पुणे

Sassoon hospital: ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण! समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे कोण? त्यांच्या नावाला विरोध का होतोय?

Who is Dr Pallavi Saple?: ससून हॉस्पिटलमधील गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- ससून हॉस्पिटलमधील गैरप्रकाराचा तपास करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात जे.जे. हॉस्पिटलच्या डीन डॉ. पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्षा आहेत. वैद्यकीय शिक्षण आयुक्तांमार्फत डॉ. सापळेंची नियुक्ती करण्यात आल्याचं समजतंय. या समितीमध्ये डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांचाही समावेश आहे.

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोर यांच्यावर कल्याणीनगरमधील अपघाताप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या दोन्ही डॉक्टरांना बेड्या ढोकण्यात आल्या आहेत. शिवाय एका शिपायाला देखील अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील हा गैरप्रकार धक्कादायक असल्याने याप्रकरणी तपासासाठी समितीची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

सदर प्रकरणामध्ये डॉ. पल्लवी सापळे या वादग्रस्त ठरत आहेत. त्यांच्या नियुक्तीला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोध केला आहे. चौकशी समितीच्या अध्यक्षांना बदलण्यात यावे अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. पल्लवी सापळे यांच्यावर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनीच गंभीर आरोप केल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत. सापळे यांच्यावर आरोप असताना त्यांनाच तपासासाठी पाठवणे योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, 'ज्या रक्त नमुन्याच्या फेरफाराच्या तपासासाठी येत आहेत. त्यांच्यावरच रक्तातील प्लाझा विकून खाल्ल्याचा आरोप आहे. त्यांनी यातून १३ लाख मिळवले आहेत असा त्यांच्यावर आरोप आहे. हा आरोप मी केलेला नाही. ज्या सरकारने ही समिती नेमली आहे त्याच सरकारच्या नेत्या यामिनी जाधव यांनी केला होता.स्वत:ची कार असताना, कार भाड्याची असल्याचं दाखवून ७०-८० लाटल्याचा देखील त्यांच्यावर आरोप आहे.'

डॉ. पल्लवी सापळे कोण आहेत?

डॉ. सापळे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. अनेकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना आणि आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांनीच हा आरोप केलाय.

५३ वर्षाच्या पल्लवी सापळे यांनी २०१९ मध्ये जे.जे. हॉस्पिटलच्या डीन म्हणून पदभार स्वीकारला होता. १९४७ पासून जे.जे. हॉस्पिटलला मिळालेल्या त्या सर्वात तरुण डीन आहेत. त्यांनी तीन वर्ष मिरजमधील मेडिकल कॉलेजचे नेतृत्व केलं आहे. त्यांनी १९९५ मध्ये जे.जे. हॉस्पिटलशी संलग्न ग्रँड मेडिकल कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. याच ठिकाणी त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. १९९९ मध्ये त्यांनी या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरु केलं. मिरजच्या डीन होण्याआधी त्यांना याच ठिकाणी असोसिएट प्रोपेसर म्हणून बढती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT