sassoon hospital shocking break down doctors destitute patients in deserted place at night Sakal
पुणे

Sassoon Hospital : नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो.. असा समोर आला ससूनमधील भोंगळ कारभार

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : ससून रुग्णालयातील भोंगळ कारभार वारंवार उघडकीस येत आहे. मागील वर्षभरापासून विविध प्रकरणात ससून मधील अनेक गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. त्यात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे.

ससून रुग्णालयातील डॉ बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी सोडून येतात. हा प्रकार वंचित आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. त्यानुसार ससून मधील डॉक्टर व त्याच्या सहकाऱ्यांवर आज येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात, रस्त्यावर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. दीड वर्षांपूर्वी अशाच एका बेवारस रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.परंतु दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाला पाहण्यासाठी गेल्यावर त्यांना तो रुग्ण गायब झाल्याचे लक्षात आले.

या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही. अशी माहिती मिळाली. यावरून बेवारस रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार ससून रुग्णालयात सुरू आहे अशी माहिती मिळाली.

हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. त्यानुसार सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभा होता. ससून रुग्णालयातील डॉ आदी यांनी एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली.

कुठे सोडायचे अशी विचारल्यावर 'इथून लांब नेऊन सोड,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे अशा ठिकाणी सोडायला सांगितले'. 'नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत' असे विचातल्यावर डॉ. तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो असे डॉक्टरानी सांगितले.

काही वेळाने डॉक्टरानी सांगितल्यानुसार नवीन बिल्डिंगमधला दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले.

काही वेळाने रितेशने पोलिसांना याबाबत माहिती दिली व दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-दादासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

बेवारस रुग्णांना ससून रुग्णालयात योग्य उपचार मिळत नाही. सोबतच त्यांना उपचार देण्याऐवजी स्वतः डॉक्टर त्यांना बाहेर मरणासाठी सोडून येतात. हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत चौकशी करावी म्हणजे पुढे असे घडणार नाही.

- रितेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते

हा प्रकार अतिशय गंभीर असून वैद्यकीय सेवेला काळिमा फासणारा आहे. स्वतः डॉ असे करत असतील तर रुग्णांनी जायचे कुठे? गरीब व बेवारस रुग्णांना न्याय मिळणार कसा. याची चौकशी करून डॉ व सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच आतापर्यंत असे किती रुग्णांना बाहेर सोडले याची चौकशी करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT