pune sakal
पुणे

Pune News : सासवडच्या उपबाजारात ज्वारीला उच्चांकी 6,311 रुपये दर

ज्वारीला प्रति क्विंटलला सर्वाधिक 6,311 रूपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

- श्रीकृष्ण नेवसे

सासवड : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड (ता.पुरंदर) येथील उपबाजार मार्केट यार्ड मध्ये धान्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धान्याची आवक, जावक होते.

बुधवारी (ता.26) ज्वारीला प्रति क्विंटलला सर्वाधिक 6,311 रूपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती शरद जगताप व सचिव मिलिंद जगताप यांनी दिली.

पुरंदर तालुक्यात नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत निरा आणि सासवड असे दोन बाजार व उपबाजार अनुक्रमे आहेत. यामध्ये निरा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुख्य बाजार समिती आहे. त्याअंतर्गत सासवड येथे उपबाजार समिती आहे.

निरा ही बाजार समिती गुळासाठी प्रसिद्ध आहे. तर सासवड येथील उपबाजार पवार हा धान्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे संपूर्ण पुरंदर, बारामती आणि फलटण भाग अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तांदूळ, कडधान्य व भरडधान्य असे धान्य विक्रीसाठी येते.

त्यामुळे येथील धान्यबाजार हा चांगलाच प्रसिद्ध असल्याने येथून पुण्यासह विविध भागात धान्य विक्रीसाठी जाते. परंतु आता खरीप हंगाम सुरू झाल्याने येथील बाजार आवक काही प्रमाणात कमीअधिक होत आहे.

त्यामुळे बाजारात चढउतार होतात. काल ता. 26 बुधवारीही बाजारात काही प्रमाणात म्हणजेच 64 क्विंटल ज्वारीची आवक तशी कमी असल्याने दरात चांगलीच वाढ झाली होती.

त्यामुळे समितीतील एक नंबर प्रतीच्या ज्वारीला 6,311 रूपये प्रति क्विटंल, तर दोन नंबर प्रतीच्या ज्वारीला 5,155 रूपये, तर तीन नंबर प्रतीच्या ज्वारीला 4000 रूपये प्रति क्विंटल असा दर मिळाला., असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यास बाजार समितीने दुजोरा दिला.

सासवड येथील बाजारामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले धान्य विक्रीसाठी आणावे. तसेच बाजारामध्ये शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील., असे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. बाजार उपआवारात सर्वाधिक गव्हाची आवक झाली.

दर बरे होते. बाजरी आवक टिकून आहे. मात्र तांदूळ, हरभरा, मका, सोयाबीन आवक जेमतेम राहीली. दरही बऱयापैकी होते. त्यामुळे खपही चांगला झाला., असेही चर्चेतून समजले. स्थानिक पुरंदर तालुक्यात खरीप हंगामाच्या पेरण्या सुमारे 30 टक्केच झाल्या आहेत. त्यामुळे टंचाई, खरीप वाया जाण्याची भिती, दुष्काळाचे थोडे सावट आहे. त्यातूनच धान्याचे भाव बऱयापैकी दबावातच आहेत., असे व्यापारी व शेतकऱयांनी सांगितले.

- चौकट

सासवड येथील उपबाजारात धान्याची झालेली आवक व दर (प्रति क्विंटल) :

धान्य -- आवक -- जावक -- प्रत एक -- प्रत दोन -- प्रत तीन

ज्वारी -- 64 -- 60 -- 6,311 -- 5,155-- 4000

बाजरी -- 39 -- 36 -- 3,200 -- 3,000 -- 2,800

गहू -- 170 -- 160 -- 3,300 -- 3000 -- 2700

हरभरा -- 6 -- 6 -- 4500 -- 4200 -- 3900

तांदुळ -- 12 -- 12 -- 4600 -- 4300 -- 4000

मका -- 11 -- 11 -- 2211 -- 2135 -- 2060

सोयाबीन - 10 - 10 - 4500 -- 4500 -- 4500

--------

सासवड (ता.पुरंदर) : येथील उपबाजार आवारात ज्वारीचा लिलाव होतानाचे दृश्य.

* श्रीकृष्ण नेवसे (बातमीदार सासवड) ता. 27 जुलै 2023

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT