Maharashtra Police Sakal
पुणे

पुणे पोलिसांच्या हेल्पलाइनमुळे ‘समाधान’

पोलिस कर्मचारी उदय नेवसे हे निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या भविष्य निर्वाह निधीसह अन्य महत्त्वाच्या कामांसाठी सातत्याने पोलिस आयुक्तालयात येत होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पोलिस कर्मचारी उदय नेवसे हे निवृत्तीनंतर त्यांना मिळणाऱ्या भविष्य निर्वाह निधीसह अन्य महत्त्वाच्या कामांसाठी सातत्याने पोलिस आयुक्तालयात येत होते. त्यामध्ये त्यांचा वेळ, श्रम वाया जाण्याबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत होता. मात्र, काही महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या ‘समाधान हेल्पलाइन’ची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार, आता नेवसे यांना हेल्पलाइनद्वारे त्यांच्या कामाच्या प्रगतीची वेळोवेळी माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे त्यांचे कष्ट, पैसेही वाचले आहे. अशा पद्धतीने सध्या पुणे पोलिस आयुक्तलयातील पोलिस कर्मचारी व निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘समाधान हेल्पलाइन’चा चांगलाच आधार मिळू लागला आहे. या वर्षी एक हजारांहून अधिक पोलिसांना ‘समाधान’चा फायदा झाला आहे.

दरवर्षी शहर पोलिस दलातून अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त होतात. सेवानिवृत्तीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागते. केवळ सेवानिवृत्तच नाही, तर सेवा बजावणाऱ्या पोलिसांनाही त्यांच्या नोकरी संदर्भातील विविध प्रकारच्या कार्यालयीन कामांसाठी पोलिस आयुक्तालयात सातत्याने फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यातून त्यांचे प्रश्‍न सुटण्याऐवजी शारिरीक व मानसिक त्रास व्हायचा. या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पुणे पोलिसांनी सेवा बजावणाऱ्या व सेवानिवृत्ती पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘समाधान हेल्पलाइन’ सुरू केली. या हेल्पलाईनला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.

...हा त्रास झाला कमी

सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना अर्जित रजा, वेतननिश्‍चिती, वेतनवाढ, वेतन पडताळणी, सीट रिमार्क, बक्षिसे, घरभाडे, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, पगारातील वजावटी, पदोन्नती, पोलिस कल्याण, अशा विविध कामांसाठी पोलिस आयुक्तालयामध्ये यावे लागत होते. हा त्रास कमी व्हावा, कामात सुलभता यावी, यादृष्टीने समाधान हेल्पलाइन कक्षाची स्थापना झाली. त्यासाठी ०२०-२६१२८८५४ हा क्रमांक उपलब्ध केला आहे.

फोनवर कळते कामाची स्थिती...

पोलिसांनी आपल्या कामांसाठी थेट पोलिस आयुक्तालयातील कार्यालयात येण्यापेक्षा थेट संबंधीत क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांची तक्रार नोंदवून घेणे, पुढील प्रक्रियेसाठी पाठविणे तसेच त्यांचे काम नेमक्‍या कोणत्या टप्प्यावर पोचले आहे. याबाबतची माहिती या हेल्पलाइनद्वारे दिली जात आहे. त्याचा पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसह सेवानिवृत्तांनाही चांगला उपयोग होऊ लागला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरीक्त पोलिस आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाकडून हे काम पाहिले जात आहे. यावर्षी एक हजार ५१ इतक्‍या तक्रारी आल्या. त्यापैकी एक हजार २७ तक्रारींची पूर्तता झाली आहे, तर केवळ २४ तक्रारी प्रलंबित आहेत.

सेवानिवृत्त पोलिसांसह कर्तव्यावर असणाऱ्यांनाही कार्यालयीन कामात अनेक अडचणी येत होत्या, त्यामुळे त्यांनाही त्रास होत होता. हे टाळण्यासाठीच हेल्पलाइन सुरू केली. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ, श्रम व पैशांचीही बचत होत आहे. तसेच, त्यांची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्याबाबत त्यांचा सकारात्मक प्रतिसादही आम्हाला मिळत आहे. या यंत्रणेचे राज्यपातळीवरही कौतुक केले आहे.

- डॉ. जालिंदर सुपेकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त, प्रशासन, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT