औंध : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून यास राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा औंध, बाणेर, बालेवाडी,पाषाण,सुतारवाडी, सोमेश्वरवाडी,सूस, महाळुंगे,बोपोडी, बावधन,बहिरटवाडी,खैरेवाडी,गोखले नगर,जनवाडी,माॅडेल काॅलनी,भोसले नगर,वाकडेवाडी, मुळारस्ता, पाटील इस्टेट,छत्रपती शिवाजी महाराज नगर,संगमवाडी,पांडवनगर,छत्रपती शिवाजी महाराजनगर,पीएमसी काॅलनी या परिसरातील मराठा समाजबांधव,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात मराठा समाजाचे आंदोलन हे शांततेत सुरु असताना ते भरकटण्यासाठी प्रयत्न केले जात असून मराठा समाजाची दिशाभूल करणारी आश्वासने देण्यापेक्षा मराठा आरक्षण जाहीर करावे,जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घेण्यात यावे अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या.तसेच जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत
नेत्यांना प्रवेशबंदी व दिवाळी साजरी केली जाणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अनेकांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मांडली.या परिसरातील आंदोलनास सर्वधर्मियांनी पाठिंबा दर्शवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.