Pune University 
पुणे

Pune University: पुणे विद्यापीठातील भिंतींवर मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर, गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sandip Kapde

Pune University: पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये १ तारखेला जोरदार राडा झाला होता.  स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. दरम्यान विद्यापीठातील वातावरण आणखी चिघळत चालले आहे. काल रात्री विद्यापीठातील भिंतीवर पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह लिहल्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 8 नंबर होस्टेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल आक्षेपार्ह पद्धतीने लिहिले आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संबधित आक्षेपार्ह मजकूर कुणी लिहिला याचा शोध विद्यापीठाकडून सुरु आहे. विद्यापीठात पंतप्रधान यांच्याविषयी मजकूर लिहिल्याने खळबळ निर्माण झाली आहे.

दरम्यान, विद्यापीठातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याच्या निषेधार्थ भाजपा पुणे शहराच्या वतीने आज (शुक्रवार) दुपारी दीड वाजता विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे.

१ तारखेला काय घडलं होतं?

एएसएफआय आणि आभाविपमध्ये वाद निर्माण झाला होता. एसएफआयचे कार्यकर्ते विद्यापीठात सदस्य नोंदणी करत होते. यावेळी अभाविप आणि एसएफआयचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या हाणामारीत दोन्ही बाजुचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला. (Latest Pune News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur South-West Constituency: फडणवीसांविरोधात कोण? नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून 41 अर्जांची उचल

Sharad Pawar: महाविकास आघाडीची चर्चा सुरु तर तुतारीचे बहुतांश उमेदवार निश्चित? प्रचार सुरु करण्याच्या सुचना!

Latest Maharashtra News Updates : १ नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात थंडीची चादर पसरणार, माणिकराव खुळे यांचा अंदाज

Shivsena Candidate List : बंडात साथ देणाऱ्या 'या' तिघांना शिंदेंच्या पहिल्या यादीत स्थान नाही! कोण कुठून लढणार वाचा एका क्लिकवर

Eknath Shinde : शिंदे, वायकर, सामंत बंधू ते पाटील,जाधव; शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर, वाचा यादी एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT