Savitribai Phule Pune University Sakal
पुणे

पुणे : विद्यापीठातील बांधकाम खर्चाचे रतीब थांबवा

दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाईची मागणी 

सम्राट कदम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांना दरवर्षी पायाभुत सुविधांसाठी कोट्यावधी रूपये देण्यात येतात. मागील पाच वर्षांपासूनच बांधकाम सातत्याने चालू आहे. एकदाचे काय सर्व पैसे घेऊन बांधकाम संपवा, अशी मागणी अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी बैठकीत केली. 

विद्यापीठाच्या अधिसभेच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजात अर्थसंकल्पीय दुरूस्त्या सुचविताना ढोरे यांनी ही मागणी केली. ते म्हणाले, "सायन्स पार्क, व्यवस्थापनशास्र विभाग, भूशास्र विभाग, सामाजिकशास्र संकुल आदी इमारतींच्या बांधकामासाठी दरवर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येते. अनेक प्रकल्पांची मुदत संपली तरी विकसकांकडून बांधकाम पुर्ण करण्यात आले नाही. सायन्सपार्कमध्ये पाण्याची आणि ड्रेनेजची कामे अपुर्ण आहेत.

सामाजिक शास्र विभागाचे मागील १० वर्षांपासून काम चालू आहे. अजूनही ते पुर्ण झाले नाही. तर अशा बांधकामांना दरवर्षी ही तरतूद का करायची" असा प्रश्न ढोरे यांनी विचारला. बांधकाम समितीच्या कामावर ढोरे यांच्यासह सदस्यांनी ताशेरे ओढले. संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सदस्यांनी केली. दोषी अधिकाऱ्यांना कामावरून कमी करण्याची मागणीही सदस्यांनी यावेळी केली.  मागील दहा वर्षांपासून विद्यापीठ हेच कामे करत राहणार असेल, तर कामे पुर्ण केंव्हा होणार. ढोरे यांनी यावेळी व्यवस्थापनशास्र विभाग, भूशास्र विभाग, सामाजिक शास्र विभाग, भाषा भवन आदींची तरतूद शुन्य रूपयांची तरतूद करण्याचे दुरूस्ती केली.  

पारंपारीक विभागांकडे दुर्लक्ष : 

रसायनशास्र, भौतिकशास्र, प्राणीशास्र, वनस्पतीशास्र आदी विभागांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. मात्र या इमारतींच्या नवीन बांधकामासाठी मागील पाच वर्षात कोणतीच तरतूद नसल्याबद्दल जबाबदार प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यापीठाच्या नावलौकीकात भर पाडणाऱ्या या विभागांकडे स्थावर किंवा बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या विभागांतील प्रयोगशाळांना सध्या जुन्या भिंती, अपुरी जागा, जर्जर झालेले रंग, गळणारे छत, बुरशीचे छत आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. भौतिकशास्र विभागाच्या नव्या इमारतीचे बांधकाम मागील काही वर्षांपासून थांबविण्यात आले आहे. 

जाणीवपूर्वक दिरंगाई नाही :

केवळ अधिकाऱ्यांना दोष देऊन चालत नाही. बांधकामात मागील चार वर्षात अनियमितता दिसत होती. आता आपण बांधकाम दिरंगाईला दंड लावण्याचे काम सुरु केले आहे. प्रत्येक दिरंगाईला काहीना काही कारण आहे. जाणीवपूर्वक ते केले नाही, असे उत्तर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिले. आता आपण अपूर्ण काम पूर्ण करण्यावर भर देत आहे. काहींचे शुल्क अजून देणे बाकी आहे, म्हणून ही तरतूद केली आहे. इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, परिसराच्या विकास आणि मूलभूत कामासाठी या वर्षात तरतूद करण्यात आली आहे, असेही पांडे म्हणाले.

बांबु हाऊसचा किती विद्यार्थ्यांना फायदा...

कौशल्य विकासा अंतर्गत विद्यापीठात बांबु हाऊसची स्थापना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना बांबुशी निगडीत हस्तकला आणि विद्यार्थी प्रशिक्षणासाठी या केंद्राचा वापर करण्यात येतो. मागील दोन वर्षांपासून हे केंद्र बंद आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात १० लाखाची तरतूद करण्यात आली. नक्की याचा फायदा किती विद्यार्थ्यांना झाला, याची माहिती अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी ढोरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT