पुणे महापालिका हद्दीतील पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू
पुणे - ‘गेल्या वर्षांपासून शाळा बंद होती. ऑनलाइन शिकविले जात होते, परंतु मोबाईलवरून अभ्यास करताना खरच काही कळत नव्हते. आता आजपासून शाळा सुरू झाल्याने खूप छान वाटत आहे,’’ अशा शब्दांत खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयातील इयत्ता पाचवीत असणाऱ्या अंजली पवार आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अंजली आणि तिच्याप्रमाणे हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळेत पाऊल ठेवले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून बंद असलेल्या शाळा आता टप्प्या-टप्प्याने सुरू होत आहे. महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. प्रवेशद्वाराजवळ फुलांची आणि फुग्यांची सजावट, रांगोळीच्या पायघड्या, विद्यार्थ्यांचे औक्षण अशी जय्यत तयारी शाळा व्यवस्थापनाने केल्याचे पाहायला मिळाले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी दरवर्षी जूनमध्ये होणारा प्रवेशोत्सवाची अनुभूती घेतली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहरातील सुरू झालेल्या शाळांमध्ये उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असली तरी, प्रत्यक्षात हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, उत्साह वाखाणण्याजोगा होता. पुणे महापालिकेच्या हद्दीतील जवळपास ९५० शाळांपैकी ४८० शाळांची तपासणी झाली. त्यातील ३९८ शाळा सुरू झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
पहिल्याच दिवशी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकही जागृत असल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांची आरोग्याविषयक घेतली जाणारी काळजी, याबाबत पालकांना यापूर्वी सांगितले आहे. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार होत आहेत.
- रोहिदास भारमळ, मुख्याध्यापक, भावे प्रशाला
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.