Second accident in week collapse of slab on blocked drain pune sakal
पुणे

Pune News : अनेक वर्षे रखडलेले रस्त्याचे काम सुरू तर झाले मात्र दर्जा निकृष्ट

बंदीस्त गटारावरील स्लॅब खचल्याने आठवड्यातील दुसरा अपघात; खडकवासला येथील स्थिती

निलेश बोरुडे

किरकटवाडी : मुख्य सिंहगड रस्त्याचे खडकवासला गावच्या हद्दीतील अनेक वर्षांपासून रखडलेले काम काही महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे मात्र सदर कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. खडकवासला धरण चौकातील बंदीस्त गटारावरील स्लॅब खचून सिपोरेक्स ब्लॉक भरलेल्या ट्रकचा अपघात झाला आहे. अशाप्रकारे स्लॅब खचून अपघात होण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

वन विभागाची परवानगी व इतर अनेक कारणास्तव रखडलेले खडकवासला येथील रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन निविदा काढून नवीन ठेकेदाराच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी सुरु केलेले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी धरण चौकात रस्त्याच्या एका बाजूने सिमेंट कॉंक्रिटचे बंदीस्त गटार बांधण्यात आलेले आहे.

मागील आठ दिवसांत दोन वेळा या गटारावरील स्लॅब खचून अपघात झाला आहे. अगोदरच या रस्त्याचे व गटाराचे काम अर्धवट असून कामाचा वेगही अत्यंत मंद आहे. त्यातच अशाप्रकारे स्लॅब खचत असल्याने झालेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.

अधिकाऱ्यांची मानसिकता कसंही करुन काम संपविण्याची अनेक वर्षांपासून काम रखडल्याने खडकवासला व परिसरातील नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. गैरसोय होत असल्याने नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन करुन सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले आहे. त्यामुळे 'आता कसेही करुन काम संपवायचे' या मानसिकतेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत.

याचा परिणाम कामाच्या दर्जावर होत असून संबंधित ठेकेदार निकृष्ट काम करत असला तरी अधिकारी त्याला काहीही बोलत नाहीत. ठेकेदाराला काही बोलावे तर ठेकेदार, 'माझे काम टर्मिनेट करा' असे म्हणत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे अधिकारीही 'ठेकेदाराच्या कलेने' काम करुन घेत आहेत. याचा परिणाम मात्र कामाच्या दर्जावर होत असून या कामाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

"गाडी भरलेली दिसत असली तरी त्यात सिपोरेक्स ब्लॉक असून वजन कमी आहे. रस्ता अरुंद आसल्याने थोडी कडेला गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला तर असा अपघात झाला. गाडीचा टायरही फुटला असून नाहक नुकसान झाले आहे."

- गुरुनाथ भुरे, अपघातग्रस्त ट्रकचालक.

"हलक्या वजणाच्या वाहनांनी स्लॅब खचत असेल तर निश्चितच अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नसणार. अशा कामाची चौकशी व्हायला हवी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कामाच्या दर्जाकडे अधिकारी अजिबात लक्ष देत नाहीत असे दिसत आहे."

- संकेत मते, नागरिक, खडकवासला.

"धरण चौकात रस्ता अरुंद असल्याने गटाराची उंची रस्त्याशी समतल ठेवण्यात आली आहे. ते पायी चालण्यासाठी असून वाहनांसाठी नाही. जेथे गटाराचा स्लॅब खचला आहे तेथे दुरुस्ती करून घेण्यात येईल व त्यावर वाहने जाणार नाहीत अशी उपाययोजना करण्यात येईल."

- धनराज दराडे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT