खडकवासला : मराठवाड्यातील मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी येथील मराठे मुळचे कुणबी आहेत. त्याचे पुरावे शोधण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे पाच जणांची निवड केली आहे. यामध्ये मोडी लिपी जाणकार म्हणून कोंढवे- धावडे येथील मनोज सरपाटील यांची निवड झाली आहे.
रसकट मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले होते. या पार्श्वभूमीवर सध्याच्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू आहे. त्या संदर्भात मराठवाडयातील मराठा समाजास ‘मराठा कुणबी’, ‘कुणबी- मराठा’, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक व अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करायची आहे.
या तपासणी अंती पात्र व्यक्तींना ‘मराठा कुणबी’, ‘कुणबी- मराठा’ जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती पूर्ण करायची आहे. या संदर्भात राज्य सरकारने न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांची समितीस नेमली आहे. या समितीला अहवाल सादर करावयाचा आहे.
दरम्यान येथे असणारे सर्व कागदपत्रे मोडी लिपी मध्ये आहे. म्हणून मुंबई येथील पुराभिलेख संचालनालय, यांचेकडून मिळालेल्या मोडी लिपी जाणकार व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत. येथील कामाचे व्यापक स्वरूप आहे. त्यामुळे अधिक मोडी लिपी जाणकार व्यक्तींची आवश्यकता आहे. त्यानुसार मोडी लिपी जाणकार व मानधन तत्वावर अभिलेख तपासणीचे काम सुरू आहे.
शिंदे समितीस माहिती उपलब्ध करुन देणे अनुषंगाने मोडी लिपी जाणकार व मानधन तत्वावर अभिलेख तपासणीचे काम करावयाचे आहे. यामध्ये पुणे कोंढवे- धावडे येथील मनोज सरपाटील यांच्यासह भोर येथील विशाल कारळे, सातारा येथील घनशाम ढाणे, कोल्हापूरचे एफ. एम. हुसेन, फलटणचे सागर काकडे यांची निवड केली आहे.
सरपाटील यांनी 2011 मध्ये मोडी लिपी चे शिक्षण घेतले आहे. सध्या ते फारशी लिपी शिकत आहेत. सरपाटील यांनी नांदेड येथे तर घनशाम ढाणे यांची धाराशिव येथे पोहचले आहेत. त्यांनी गुरुवार पासून काम सुरु केले आहे. ‘नांदेड मधील दस्तऐवजांमध्ये मोडीलिपी बरोबर मोठ्या प्रमाणात फारशी शब्द दिसून आला आहे. नांदेड येथील कामाचा व्याप मोठ्या प्रमाणावर आहे.’ अशी माहिती मनोज सरपाटील यांनी सकाळ’शी बोलताना दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.