Self-help group was transformed into Women Farmers Producers Company In Zendewadi 
पुणे

पुरंदरच्या झेंडेवाडीत बचत गटाचे रुपांतर झाले `महिला शेतकरी उत्पादक कंपनीत`

दोन कोटी खर्चाचा प्रक्रीया प्रकल्प., स्वहिस्सा 14 लाख व कृषी स्मार्टचे 97 लाख, बँकतर्फे 52 लाखांचे पाठबळ

श्रीकृष्ण नेवसे

सासवड - दिवेघाटावर झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील महिला शेतकऱयांनी एकत्र येऊन महिला बचत गट सुरु केला होता. आता या बचत गटाचे रुपांतर `पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी`त झाले आहे. अगोदरचा प्रकीया प्रकल्प सुरु असतानाच... नव्या विस्तारीत वाटाणा, सिताफळ व इतर शेतीमालावर प्रक्रीया करण्याची यंत्रणा घेणे, शीतकरण यंत्रणा, हार्डनर, 40 टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज, शेड उभारणी आणि इतर यंत्रणांसाठी दोन कोटी खर्चाचा प्रकल्प आखला. त्यास कृषी यंत्रणेकडून स्मार्ट प्रकल्पातून 97 लाखांचे कर्ज मंजूर झाले. महिलांचा स्वहिस्सा 14 लाख व बँकतर्फे 52 लाखांचे पाठबळ मिळाले. त्यातून या महिला शेतकऱयांची कंपनी 20 गुंठे क्षेत्रावर आकार घेत आहे.

खरे तर सन 2014 मध्ये केवळ 20 महिलांनी एकत्र येत अगोदर लक्ष्मी महिला शेतकरी बचत गट सुरु केला. लोणची, पापड, चटणी आदी तयार करुन विक्रीपर्यंत मजल गेली होती. लाख - दोन लाख कमाई होती. कृषी व नाबार्डकडून प्रशिक्षण घेतल्यावर कंपनी स्थापन्याचे बळ लाॅकडाऊनमध्ये मिळाले. पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा संगीता झेंडे, सचिव स्नेहल खटाटे, संचालीका मनिषा खटाटे, बायडा झेंडे, रुपाली खटाटे, जयश्री झेंडे, कविता झेंडे, शोभा झेंडे, आरती झेंडे, सारिका झेंडे आदींनी तांत्रिक कामासाठी समुहास सहाय्य होण्यासाठी विठ्ठल झेंडे यांना फ्रोझन शेतीमाल प्रक्रीया, शीतगृह व इतर तांत्रिक प्रशिक्षण घेण्याचे सूचविले. ते त्यांनी घेतले.

कंपनीत सध्या 350 भागधारक सभासद आहेत. कंपनीमार्फत परीसरातील विविध फळे, शेतीमालावर प्रक्रीया करुन मुल्यवर्धन केले जाईल. शीतगृहात साठवणुक करत योग्य दर मिळताच विक्री उभारली जात आहे. कंपनीने तीन लाखांची फ्रोझन यंत्रणा व मोठा फ्रिज घेतलेलाच आहे. आता मागिल महिन्यात भूमिपुजन होऊन शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी हाती घेतली. लवकरच कंपनीच्या प्रत्यक्ष शेतीमाल प्रक्रीया प्रकल्पात 50 महिला व वाहतुक, विक्री व्यवस्थेत 10 पुरुषांना रोजगार उपलब्ध होईल.

कोरोनाने संधी दिली.. यंदाचा व्यवसाय 15 लाखांचा.,पुढील वर्षी 50 लाखांवर जाईल

कोरोनाचे संकट असतानाच सन 2020 मध्ये हीच संधी साधली व बचत गटाचे रुपांतर कंपनीत केले. अनेक निर्बंधांमुळे बाजारात मर्यादा असल्याने स्थानिक शेतकऱयांकडून कंपनीने सीताफळ, वाटाणा, टोमॅटो, कैरी खरेदी केली. कमाई वाढत असताना.. सन 2020-21 मध्ये 5.5 लाखांचा व्यवसाय केला. तर प्रक्रीयेद्वारे सीताफळ पल्प (गर) पाच टन, फ्रोझन वाटाणा दोन टन, कैरी फोडी एक टन मालाची स्थानिक व नजिकच्या बाजारपेठेत विक्री केली. पल्प हैद्राबादच्या व्यापारांना विकला. त्यातून 15 लाखांचा व्यावसाय सन 2021 - 22 मध्ये झाला. पुढील वर्षभरात व्यवसाय 50 लाखांच्या पुढे जाईल. इतक्या महिला झटतायेत., असे तांत्रिक सल्लागार विठ्ठल झेंडे म्हणाले.

यांचे मिळाले पाठबळ...

``कृषी संचालक (निविष्ठा - गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) चे अधिकारी दशरथ तांभाळे, आमदार संजय जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडळ अधिकारी शेखर कांबळे, नाबार्डचे सचिन कांबळे, रोहन मोरे, बँक महाराष्ट्रचे व्यवस्थापक विजय कांबळे, तांत्रिक सहाय्य विठ्ठल झेंडे आदींचे पाठबळ मिळाल्याने आम्हा महिलांच्या बचत गटाचे रुपांतर शेतकरी उत्पादक कंपनीत झाले आणि प्रकल्प प्रगतीपथावर आहे. सध्याही प्रक्रीयेचे काम, साठवणुक व विक्रीचे काम सुरुच आहे. गटातर्फे पूर्वीपासूनच महिला सदस्यांना दुधाळ जनावरे खरेदीला, मुलांच्या शिक्षणाला रास्त व्याजदरात अर्थसहाय्य दिले जाते. भविष्यात कंपनीमार्फत पशूपालनास अधिक गती देणार, दूध डेअरी सुरु करण्याचे नियोजन आहे.``

- संगिता झेंडे, अध्यक्षा, पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी, झेंडेवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT