Seven more accused involved crime investigation revealed mephedrone sold from Sassoon hospital sakal
पुणे

Pune News : ‘ससून’मधील अमली पदार्थ प्रकरण: मेफेड्रॉनबाबत सात नवे आरोपी निष्पन्न

पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ससून रुग्णालयातून मेफेड्रॉनची विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी सात आरोपींची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत. अमली पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरविणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाली आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सोमवारी (ता. १६) न्यायालयास सांगितले.

समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित ऊर्फ, रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख आणि गोलू (तिघेही रा. मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील व त्याचे साथीदार नाशिक येथील ‘एमआयडीसी’मध्ये ज्या कारखान्यात मेफेड्रॉन तयार करत होते, तो कारखाना कांबळे याचा आहे. शिंदे हा मेफेड्रॉन तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवीत. पंत, जिशान आणि पंडित हे मेफेड्रॉन तयार करत, तर इम्रान आणि गोलू हे दोघे तयार झालेल्या अमली पदार्थांची विक्री करत, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.

अटकेत असलेले आणि फरार असलेल्या आरोपींनी मेफेड्रॉन विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह तपासादरम्यान येणाऱ्या विविध मुद्यांची चौकशी करायची आहे. त्यामुळे भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या पोलिस कोठडीत आठ दिवसांची वाढ करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नीलम यादव-इथापे यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी आरोपींच्या कोठडीत २० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

पोलिसांचे अपयश :

नव्याने निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी दोघे अटकेत आहेत. त्यांना अद्याप ताब्यात घेता आले नाही, हे पोलिसांचे अपयश आहे. गुन्ह्यातील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे आरोपींच्या पोलिस कोठडीची आवश्‍यकता नाही, असा युक्तिवाद आरोपींचे वकील संदीप बाली यांनी केला.

आठ पेन ड्राईव्ह, तीन किलो सोने जप्त :

भूषण पाटील याच्या घरझडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने आठ पेन ड्राईव्ह मिळाले. तसेच बलकवडे याच्याकडून तीन किलो सोने जप्त केले आहे. मेफेड्रॉनची विक्री करून आलेल्या पैशांतून ललित पाटील याने पाच किलो सोने घेतल्याचे अटकेतील आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

या बाबींचा होणार तपास

  • कच्चा माल पुरविण्यात आणखी कोणाचा सहभाग

  • मेफेड्रॉनच्या विक्रीतून आलेले पैसे आरोपींनी कशासाठी वापरले

  • आरोपींना अमली पदार्थ बनविण्याचे कोणी शिकवले

सातपैकी दोन आरोपी अटकेत

नव्याने निष्पन्न झालेल्यांपैकी दोन आरोपी सध्या मुंबर्इत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात अटकेत आहेत. जिशान शेख आणि शिवाजी शिंदे, अशी त्यांची नावे आहेत. या दोघांना बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात न्यायालयाच्या परवानगीने हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी आतापर्यंत १२ साक्षीदारांकडे तपास केला आहे.

गणवेश परिधान न केल्याने नोटीस

न्यायालयीन कामकाजावेळी साध्या वेशात उपस्थित राहिल्याने गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांना न्यायालयाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. पोलिस आयुक्तांमार्फत यावर १५ दिवसांत लेखी म्हणणे सादर करावे, असे नोटिशीत नमूद केले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ही नोटीस दिली.

ससूनमधील अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले होते. तपास अधिकारी तांबे हे साध्या वेशात न्यायालयात उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT