Puja Khedkar news esakal
पुणे

Puja Khedkar: मी लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून...पूजा खेडकरच्या सुप्रीम कोर्टातील आरोपावर पुणे जिल्हाधिकारी काय म्हणाले?

Sandip Kapde

सुप्रीम कोर्टान सुनावणीवेळी पूजा खेडकर यांनी मोठा आरोप केला होता. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळेच हे सर्व घडत आहे, असा दावा करण्यात आला होता. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या लैंगिक छळाच्या आरोपांना फेटाळून लावले. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पूजा खेडकर ३ जून ते १४ जून या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात संलग्न होत्या. या काळात, मी तिला फक्त तीन वेळा भेटलो, तेही माझ्या अधिकारी आणि वकिलांच्या उपस्थितीत. १४ जूननंतर, त्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात संलग्न होती," असे सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.

दिवसे म्हणाले की, खेडकर यांनी इथं असताना कोणतेही आरोप केले नव्हते. राज्य सरकारला दिलेल्या पत्रातही, माझ्या पत्राच्या उत्तरात, त्यांनी असे कोणतेही आरोप केले नाहीत. त्यांनी वाशिमला गेल्यावरच हा त्रासाचा मुद्दा उपस्थित केला आणि तो नंतर आरोप करायला सुरुवात केली.


आरोपानंतरच्या हालचाली-


दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत कथित गैरवर्तणुकीबद्दल राज्य सरकारला पत्र लिहिले होते. दिवसे यांच्या अहवालानंतर खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. त्यानंतर खेडकर यांनी दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. दरम्यान दिवसे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

यूपीएससीचा निर्णय-


केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) बुधवारी खेडकर यांच्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेतील उमेदवारी रद्द केली आणि नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तिला आयोगाच्या भविष्यातील कोणत्याही परीक्षांमध्ये बसण्यास मनाई केली. खेडकर यांच्यावर खोटे अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्र सादर केल्याचे आरोप आहेत.


न्यायालयीन दावे-


दिल्लीतील अतिरिक्त सत्र न्यायालयात, खेडकर यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्याविरुद्ध लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध खटला दाखल केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lebanon Pager Blast: वायनाडच्या शिंप्याचा मुलगा नॉर्वेत कसा पोहचला? का चर्चेत आहे जोस टेलर

Latest Marathi News Updates : उच्च न्यायालयायाचा मोठा निर्णय! मुंबई सिनेटची निवडणुक उद्याच होणार

Ruturaj Gaikwad: फिल्डिंगमध्येही दिसला ऋतुचा 'राज', डाव्या हाताने भारी कॅच पकडत रियान परागला धाडलं माघारी

IND vs BAN, 1st Test: 'बॅड लाईट'मुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, भारताला विजयासाठी ६ विकेट्सटची गरज

OYO Hotels: आता अमेरिकेत सुद्धा होणार ओयोची हवा! 43 अब्ज रुपये गुंतवून घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT