पुणे

शनिवारवाड्याचा जीर्णोद्धार करावा; पेशव्यांच्या वंशजांची अपेक्षा

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त बुधवारी शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - थोरले बाजीराव पेशवे यांच्यासारख्या देदीप्यमान व्यक्तीचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला (Pune Railway Station) द्यावे, तसेच श्रीमंत नानासाहेब पेशवे (Nanasaheb Peshave) यांचे नाव नव्याने होणाऱ्या मेट्रो स्थानकाला द्यावे. शनिवारवाड्याची दुरवस्था झाली असून, त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारने निधी द्यावा, तसेच शनिवारवाडा परिसरातील प्रलंबित कामे येत्या तीन ते चार महिन्यांत पूर्ण करावी, अशी मागणी बाजीराव पेशवे यांच्या वारसदारांनी केली.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त बुधवारी शनिवारवाड्यावरील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, संदीप खर्डेकर, संस्थेचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, पेशव्यांचे वंशज श्रीमंत उदयसिंहजी पेशवा आणि कुटुंबीय, मोहन शेटे, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे, उदय गांगल, श्रीकांत नगरकर, उमेश देशमुख या वेळी उपस्थित होते.

गोखले म्हणाले, ‘पेशव्यांची जयंती व पुण्यतिथी शनिवारवाड्यासह शहराच्या इतर भागांमध्येदेखील साजरी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’

शेटे म्हणाले, ‘थोरले बाजीराव पेशवे हे ४८पेक्षा जास्त लढाया जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे ते योद्धे होते. त्या काळी मराठ्यांनी पानिपतमध्ये रक्त सांडले म्हणून आजचा हिंदुस्थान आपल्याला पाहायला मिळत आहे. पराक्रमाचा हा इतिहास आचरणात आणण्याची गरज आहे.’

थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापर्यंत जाता येत नाही, ही शोकांतिका आहे. अनेकदा मागणी करूनही येथे पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी जिना उभारण्यात आलेला नाही. महापालिकेने याकडे लक्ष देऊन त्वरित जिना उभारावा.

- मेधा कुलकर्णी, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT