Sharad Mohol Case Esakal
पुणे

Sharad Mohol Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह सहाजण ताब्यात, नवी मुंबई पोलिसांची कारवाई

अंकिता खाणे (Ankita Khane)

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलार याच्यासह सहा संशयितांना पनवेल परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये आणखी एका सराईत गुन्हेगाराचा समावेश असून, त्यांचा गुन्ह्यातील सहभाग तपासण्यात येत आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पनवेल परिसरात रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

कोथरूड परिसरात पाच जानेवारीला दुपारी शरद मोहोळवर पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याचदिवशी रात्री साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांच्यासह दोन वकिलांना अटक केली होती.

त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रामदास उर्फ वाघ्या मारणे असं मुख्य आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे. त्यासोबतच विठ्ठल शेलार, यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे. शेलार आणि मारणे यांचा शरद मोहोळच्या हत्येचा कट रचण्यात सहभाग असल्याच तपासात निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. गुन्हे शाखेच्या तपास पथकाने काल मध्यरात्री पनवेल परिसरात कारवाई केली. त्यात संशयित विठ्ठल शेलार याच्यासह सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शेलार टोळीचे हिंजवडी, मुळशी भागात वर्चस्व असून, त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

शरद मोहोळच्या हत्येनंतर हे सर्व आरोपी पनवेल आणि वाशी भागात लपून बसले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री लपलेल्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पनवेल पोलीसांची मदत घेण्यात आली. या सर्व आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कोथरूड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी शरद मोहोळ जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी शरद मोहोळ याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मोहोळचा मृत्यू झाला. 

गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा-२ चे सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, खंडणी विरोधी पथक-१ चे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, युनिट तीनचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्यासह तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुंड विठ्ठल शेलारसह सहाजणांना पनवेल परिसरातून ताब्यात घेतले आहे. शेलारविरुध्द यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांचा या गुन्ह्यातील सहभाग तपासण्यात येत आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.

- सुनील तांबे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा-१

शरद मोहोळ कोण होता?

शरद मोहोळ पुण्यातील कुख्यात गुन्हेगार होता. शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. (Who was Sharad Mohol?)

शरद मोहोळ हा दहशतवादी कातील सिद्दीकी याच्या खुनातील आरोपी असून सिद्दीकीचा येरवडा कारागृहात गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती मात्र अलीकडच्या काळात सगळ्या काळ्या गोष्टी मागे ठेवत समाज कार्यात चांगल्या प्रकारे गुंतला होता. मोहोळ याच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी देखील अलीकडेच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT