Sharad Mohol 
पुणे

Sharad Mohol dead: मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक; प्राथमिक तपासात हत्येचं कारण उघड

हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (Sharad Mohol murder case Eight persons including main accused were arrested by Pune Police)

सविस्तर माहिती अशी, कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी- शिरवळदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुतारदरा येक्षील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहर, ग्रामीण परिसर, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली. सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ संशयित मोटारीचा पाठलाग करून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) याच्यासह आठ आरोपींना ताब्यात घेतले.

जमीन आणि पैशांच्या जुन्या वादातून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

Priyanka Gandhi Vadra :प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान, म्हणाल्या- तुम्ही मंचावरुन एकदा जाहीर करा...

SCROLL FOR NEXT