Sharad Mohol Murder Case New Update News marathi 
पुणे

Sharad Mohol Murder Case : ...तर शरद मोहोळ वाचला असता!, मुन्ना पोळेकरनं पोलीस तपासात असं काय सांगितलं?

Komal Jadhav (कोमल जाधव)

Sharad Mohol Murder Case New Update News : मुळशी पॅटर्न चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा थरार असल्याचं आता हळूहळू पोलीस तपासात समोर येत आहे.

अशातच भरदिवसा, पुण्यातल्या कोथरुडमधील सुतारदरा भागात, जिथे शरद मोहोळ राहायचा, त्या परिसरातच मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना पोळेकरनं याआधीही एकावर गोळीबार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे तो गोळीबार जर पोलिसांना वेळेत कळला असता तर आज शरद मोहोळ वाचला असता असंही बोललं जात आहे.

शरद मोहोळची हत्या ही मुन्ना पोळेकर अन् नितीन कानगुडे यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीत आणि शांत डोक्यानं केलेली दिसतेय. कारण, मुन्ना पोळेकर हा वयानं जरी २० वर्षांचा असला तरी त्यांच्या डोक्यातलं गँगवॉर हे कायम सुरुच होतं असं दिसतंय. कारण, शरद मोहोळनं नितीन कानगुडे याचा १० वर्षांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला त्यांनी आता घेतला तेही शरद मोहोळला संपवून. पण, आता याच प्रकरणातली एक महत्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ते म्हणजे शरद मोहोळला संपवणाऱ्या २० वर्षांच्या मुन्ना पोळेकरनं मोहोळच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वीच अजय सुतारवर गोळीबार केला होता. पण, तो गुन्हा बाहेर आला नाही अन् पुढे शरद मोहोळची ५ जानेवारीला हत्या करण्यात आली.

आता मोहोळआधी जो गोळीबार झाला, त्यावेळी नेमकं काय घडलं?

तर, मुन्ना पोळेकरनं ज्याच्यावर गोळीबार केला तो म्हणजे अजय सुतार. हा अजय सुतार नितीन कानगुडेचा मित्र. नितीन कानगुडेनं अजयला चांदणी चौकात भेटायला बोलावलं. त्यानंतर तिथून अजयला घेऊन मुन्ना पोळेकर, नितीन कानगुडे हे भूगावातील कानगुडेच्या घरी गेले. तिथे पार्किंगमध्ये बसले, त्यावेळी मुन्ना आणि नितीन कानगुडेनं अजयला शरद मोहोळचा खून करायचा आहे, तू त्यात सामील हो असं सांगितलं. पण अजयला ते पटलं नाही आणि त्यानं या हत्येच्या कटात सहभागी व्हायला नकार दिला. आणि तो नितीन कानगुडेच्या घरुन जीव मुठीत धरुन पळाला. पण, त्याचवेळी मुन्ना पोळेकरनं पळणाऱ्या अजयवर गोळीबार केला. त्यातली एक गोळी ही अजयच्या पायातून आरपार गेली तर दुसरी गोळी पायाला चाटून गेली. यावेळी गंभीर जखमी झालेल्या अजय सुतारला या दोघांनीच खासगी रुग्णालयात दाखल केलं अन् त्याला जर शरद मोहोळच्या हत्येचं कुणाला कळालं तर जीवानिशी मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अजय सुतारही गप्प राहिला.

पण, आता शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता, मुन्ना पोळेकरनं शरद मोहोळआधीही एकावर गोळीबार केल्याचा गौप्यस्फोट केला. त्यामुळे आता मोहोळच्या हत्येआधीच्या घटना एकेक करुन पोलीस तपासात समोर येत आहेत. तरी, नुकतंच पोलिसांनी आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्या एकालाही जेरबंद केल्याची माहिती आहे तर त्यांना पिस्तुलं पुरवणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. त्यामुळे आता शरद मोहोळ प्रकरणात आणखी काय काय कंगोरे समोर येताहेत हे पाहणं महत्वाचं असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींचे १० साल 'बेमिसाल', एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 5 : 'या' तारखेला पार पडणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले ? प्रेक्षकांनी ठरवली फायनलिस्टची यादी

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : मनीष सिसोदीयांनी रोहित पवार यांना भावी शिक्षणमंत्री म्हणून संबोधलं

SCROLL FOR NEXT