Sharad Mohol Dead 
पुणे

Sharad Mohol Dead: "फडणवीससाहेब मला न्याय मिळवून द्या..."; गुंड शरद मोहोळच्या पत्नीने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट

Sandip Kapde

Sharad Mohol Dead: कोथरूड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली आहे. 5 जानेवारी रोजी साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकरने शरदवर किमान तीन गोळ्या झाडल्या. त्यांना सह्याद्री रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोथरूडमधील सुतारदरा येथील त्यांच्या राहत्या घराजवळ दुपारी 1.20 च्या सुमारास गोळीबार झाला.

दरम्यान शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. स्वाती मोहोळ पुणे शहर भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी एका वाहनातून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 3 पिस्तूल, 3 मॅगझिन जप्त करण्यात आले. पोलीस आरोपीची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.

शरद मोहोळ याच्यावर तीन आरोपींनी गोळ्या झाडल्या. मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर दोन जणांनी रस्त्यावर गोळीबार केला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले. या दोघांचे शरद मोहोळसोबत वैमनस्य होते. यामुळे हल्ला झाल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. (Pune Crime News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: चित्रा वाघ यांच्यासह राज्यपाल नियुक्त आमदार विधानसभेत भाजपला कसा मिळवून देणार फायदा? वाचा काय आहे गणित...

अनफिट Mohammed Shami, आम्हाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर घेऊन जायचा नाही; Rohit Sharma स्पष्टच म्हणाला

Atul Parchure : "खूप चांगला मित्र गमावला" ; अतुल यांच्या अंत्यसंस्कारावेळी निवेदिता यांना अश्रू अनावर

IND vs NZ Test: पहिल्या कसोटीपूर्वीच न्यूझीलंडला धक्का! वेगवान गोलंदाज संपूर्ण भारत दौऱ्यातूनच बाहेर

Latest Maharashtra News Updates : काँग्रेसकडून हिरामण खोसकर यांचे सहा वर्षांसाठी निलंबन

SCROLL FOR NEXT