Sharad Mohol Case Esakal
पुणे

Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिलांना अश्रू अनावर; म्हणाले, 'आम्ही १५ वर्ष…'

Sharad Mohol Case: पुणे शहरात गँगवारमधून शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी हत्या करण्यात आली. या प्रकारात अटक केलेल्या आरोपींपैकी दोन जण वकील आहेत. त्यांना न्यायालयात अश्रू अनावर झाले.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sharad Mohol Case: पुणे शहरात शुक्रवारी हल्लेखोरांनी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या केली. या घटनेनंतर पुणे शहरात खळबळ उडाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यात दोन वकिलांचा देखील समावेश आहे. या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांची नावे समोर आली आहे.

हत्या करण्यापूर्वी शरद मोहोळ याच्यासोबत त्याच्या साथीदारांनी जेवण केलं होतं. त्यानंतर सर्व जण घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी गोळीबार केला. दरम्यान, शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी वकिलांना कोर्टात अश्रू अनावर झाले.

काय म्हणाले वकील?

ॲड रवींद्र पवार आणि ॲड संजय उड्डाण अशी या वकिलांची नावे आहेत. "आम्हाला आरोपींचा फोन आला की, त्यांनी खून केला असून, त्यांना सरेंडर व्हायचे आहे. आम्हीही त्यांना तोच सल्ला दिला, त्याची माहिती पोलिसांना फोनद्वारे कळविली" असे या वकिलांनी न्यायलायात सांगितले आहे.

आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही आम्ही तेच सांगितले. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही'' अशा शब्दात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका वकिलाने आपली बाजू मांडली. "आम्ही १५ वर्ष वकीली व्यावसायात आहोत, आम्ही काहीही केले नाही'' असे सांगताना दुसऱ्या वकिलास न्यायालयातच अश्रू अनावर झाले. वकिल न्यायालयात रडायला लागला तेव्हा तुम्ही काहीच केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही, असे म्हणत न्यायालयाने त्यांना आश्वस्त केले.

मोहोळ खून प्रकरणात ७ तरुणांसह २ वकिलांना पोलिसांनी अटक केली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणामधील आरोपींना काल न्यायालयात हजर केले होते. शरद मोहोळ खून प्रकरणात दोन वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT