sharad pawar and vitthal maniyar friendship story how they met bond of comrades Sakal
पुणे

Friendship Day 2024 : ‘पराभवातून चांगला मित्र मिळाला’ ज्येष्ठ नेते शरद पवार-विठ्ठल मणियार यांच्या मैत्रीला उजाळा

‘‘महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक शरद पवार यांच्या विरुद्ध लढवली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणूक शरद पवार यांच्या विरुद्ध लढवली. त्यात माझा पराभव झाला; परंतु पराभवातून मला चांगला मित्र मिळाला. मित्र करणे सोपे आहे; मात्र मैत्री शेवटपर्यंत टिकवून ठेवणे अवघड आहे.

मैत्री टिकविण्यासाठी एका माध्यमाची गरज असते. शरद पवार आणि माझी मैत्री ६७ वर्षे टिकण्यामागे सामाजिक काम हे माध्यम होते,’’ असे मत ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल मणियार यांनी व्यक्त केले.

के अँड क्यू परिवारातर्फे मैत्री दिवसानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विठ्ठल मणियार यांच्या मैत्रीला उजाळा देण्यासाठी ‘मैत्रीवर बोलू काही’ या मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सत्येंद्र राठी यांनी मणियार यांच्याशी संवाद साधला.

पवार आणि तुमची भेट कुठे आणि कशी झाली? त्यावर उत्तर देताना मणियार बोलत होते. यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, उल्हास लाटकर, शेखर मुंदडा आदी उपस्थित होते. पवार आणि तुमची मैत्री इतकी घट्ट असताना तुम्ही त्यांना साहेब का म्हणता? त्यावर मणियार म्हणाले, ‘‘सन १९६८ मध्ये पवार पहिली निवडणूक लढले आणि आमदार झाले.

त्यानंतर ते परत सन १९७२ मध्ये निवडणूक लढले आणि पुन्हा आमदार झाले. त्यावेळी त्यांनी दोन संस्था सुरू केल्या. त्यात काम करताना त्यांना एकेरी नावाने हाक मारणे मला अवघड वाटत असे, त्यामुळे मी त्यांना ‘शरदराव’ असे म्हणू लागलो. परंतु पवार हे सर्वांत तरुण मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्या पदाचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना साहेब म्हणू लागलो.’’

तुम्ही दोघांनी दैनिक ‘सकाळ’मध्ये काम केले आहे, तो अनुभव सांगताना मणियार म्हणाले, ‘‘‘सकाळ’मध्ये विद्यार्थी बातमीदार हवे आहेत अशी जाहिरात आली, ती जाहिरात पाहून आम्ही त्यासाठी अर्ज केला आणि आमची निवड झाली. प्रत्येक शनिवारी ‘सकाळ’मध्ये नानासाहेब परुळेकर एक बैठक घेत असत.

त्यात कोणत्या बातमीदाराने काय बातमी दिली, याविषयी सखोल चर्चा होत असे. त्यावेळी परुळेकर म्हणाले होते, ‘कमीत कमी शब्दांत आपला आशय नागरिकांपर्यंत यावा याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे शक्य होते, तेव्हा तुम्ही खरे पत्रकार होता.’ ही शिकवण मी लिखाण करताना नेहमी कामात आली.’’

पवार पंतप्रधान झाले नाहीत; याविषयी मित्र म्हणून तुमचे मत काय? त्यावर मणियार म्हणाले, ‘‘आम्ही गप्पा मारताना मागे वळून पाहतो, तेव्हा पवार म्हणतात, ‘आपल्या कर्तृत्वामुळे जे मिळाले आहे, ते अपेक्षेपेक्षा खूप अधिक आहे.’ त्यामुळे ते पंतप्रधान झाले नाहीत याविषयी त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT