Sharad Pawar And Sanjay Kakade Meeting Esakal
पुणे

Sharad Pawar: शरद पवार आता भाजपला धक्का देणार? माजी खासदार पवारांच्या भेटीसाठी मोदीबागेत

आशुतोष मसगौंडे

भाजप नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी आज सकाळी पुण्यातील मोदी बागेतील शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार आता अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांनंतर संजय काकडे यांनी पक्षात घेत भाजपला धक्का देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आशात राज्यात राजकीय भेटीगाठी वाढल्या असून, प्रत्येक ईच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. आता संजय काकडे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीबाबत भाजप काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.

संजय काकडे यांनी स्पष्ट केली भूमिका

दरम्यान शरद पवार यांच्या भेटीनंतर संजय काकडे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकारांशी बोलताना काकडे म्हणाले, "मी माझ्या मित्राच्या कामानिमित्त शरद पवार यांना भेटायला आलो होते. त्यामुळे या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. माझ्या या भेटवर पक्षातील कोणी काही बोलले तर उत्तर देण्यास सक्षम आहे. तसेच पक्षाने याबाबत विचारणा केल्यास पक्षासही स्पष्टीकरण देण्यास तयार आहे."

शरद पवार-बच्चू कडू भेट

या सर्व घडामोडींमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही आज शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर बच्चू कडू महायुतीला रामराम ठोकत महाविकास आघाडीत जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

याबाबत काकडे यांना विचारले असता, ते म्हणाले "बच्चू कडू यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचे दोन आमदार आहेत. त्यामुळे मी त्यांना कोणाबरोबर युती-आघाडी करायची याबाबत सल्ला देऊ शकत नाही. परंतु, बच्चू कडू माझे मित्र आहेत. त्यांना मी 20 वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे ते कुठे जातील असे मला वाटत नाही."

कोण आहेत संजय काकडे?

संजय काकडे हे भाजपचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार आहेत. ते 2008-09 मध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेव निवडणून गेले होते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार असताना भाजप-सेना युतीच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्यानंतर पुढे त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दरम्यान 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते भाजपकडून पुण्यातून लढण्यास ईच्छुक होते. परंतु दोन्ही वेळा त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

Nashik Accident : बसचालकाचा ब्रेकऐवजी ॲक्सिलेटर पडला पाय; शिवशाहीने ठोकल्या दुचाक्या

Nashik Cyber Fraud : इडीकडून अटकेची भिती दाखवून 90 लाखांना गंडा; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Akshay Shinde Encounter: नेमका मृत्यू कशामुळे? पोस्टमार्टम रिपोर्टमधून अक्षयच्या मृत्यूचं कारण आलं समोर

Jalgaon Jamod News : एकाच कुटूंबातील ८ जणांना जेवणातून विषबाधा; दोन आदिवासी बालकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT