Sharad Pawar statement Traders should take positive stand regarding market yard migration  esakal
पुणे

Pune Market Yard : मार्केट यार्ड स्थलांतराबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी - शरद पवार

भविष्यातील वाढता व्यापार विचारात घेऊन नवीन जागेसाठी पीएमआरडीए आणि राज्य शासनाशी चर्चा करून प्रस्तावित जागेचा विचार करावा

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : गुलटेकडी मार्केट यार्डात व्यापार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या व्यापारासाठी जागा अपुरी पडत आहे. मार्केट यार्ड स्थलांतराबाबत व्यापाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.

भविष्यातील वाढता व्यापार विचारात घेऊन नवीन जागेसाठी पीएमआरडीए आणि राज्य शासनाशी चर्चा करून प्रस्तावित जागेचा विचार करावा. असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त व्यापाऱ्यांना केले.

पूना मर्चंट चेंबरच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वाणिज्य विश्व सुवर्ण महोत्सवी विशेषांकचे प्रकाशन आणि गरजू विद्यार्थ्यांना शरद पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी तर बोलत होते.

वरिष्ठ पत्रकार डॉ. निलेश खरे, उद्योजक विठ्ठल मणियार, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठीया,

उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, वाणिज्य विश्वचे संपादक प्रवीण चोरबेले, कार्यकारीसंपादक आशिष दुगड, सहसचिव ईश्वर नहार उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

पवार म्हणाले, “काही वर्षांपूर्वी पुण्याचा मध्यवर्ती भागात नाना, भवानी पेठ या भागात भुसार बाजार होता. तेथून हा व्यापार गुलटेकडी मार्केट यार्डात नेताना प्रचंड विरोध झाला. आता त्याच ठिकाणी व्यवसायाची मोठी प्रगती झाली.

आता हा व्यापार पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. त्याबाबत चेंबरने जागा बघून त्यावर योग्य ती भूमिका घ्यावी. व्यापाऱ्यांची यामाध्यमातून वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही.” चेंबरने राज्य सरकारच्या लॉजिस्टिक पार्क धोरणाचा अभ्यास करण्याची सूचना पवारांनी यावेळी केली.

खरे म्हणाले, “संस्थेला निधी खर्च करताना समाजाप्रती आपुलकी लागते. देण्यात येणारी शिष्यवृत्ती सर्वांना प्रेरणादायी ठरेल. पुणे स्टार्टअपचे हब आहे.शरद पवार राजकारणी झाले नसते तर ते जागतिक दर्जाचे उद्योजक झाले असते.”

मणियार म्हणाले, “ मंडई विद्यापीठ कार्यक्रमात बहुतांशी विद्यार्थी बीएमसीसी होते. त्यांनी त्यावेळी शिष्यवृत्ती देण्याची सूचना शरद पवारांनी केली होती. त्यानुसार आठ विद्यार्थी आणि दोन प्राध्यापकांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.

राज्यातील अनेक संस्थांमध्ये पवारांनी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र बाठीया, स्वागत रायकुमार नहार यांनी केले. यावेळी चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती, राजेश शहा, दीपक बोरा, संचालक नवीन गोयल, शाम लढ्ढा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान

‘वाणिज्य विश्व’चे प्रथम संपादक स्व. ईश्वरदासजी चोरडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य ‘व्यापारी मित्र’चे पुरुषोत्तमजी शर्मा, रूरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्राध्यापक. डॉ. संजय कंदलगावकर यांना ‘वाणिज्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सुभाष किवडे आणि दिलीप साळवेकर यांनाही सन्मानीत आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT