NCP Political Crisis Esakal
पुणे

NCP Political Crisis: शरद पवार गटाचे पुणे शहरप्रमुख प्रशांत जगतापांच्या अडचणीत वाढ? त्यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह इतर नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह इतर नऊ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध प्रशांत जगताप यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून बदनामीकारक घोषणाबाजी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.(Sharad Pawars Pune city chief Prashant Jagtap case has been filed against 9 people including them)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचे असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डेंगळे पुलाजवळील कार्यालयाच्या ठिकाणी प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते जमले.

त्यावेळी त्यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्‌घाटनावेळी लावलेल्या कोनशिलेवर अजित पवार यांचे नाव असल्याने संबंधित कोनशीलेची तोडफोड करत घोषणाबाजी देखील केली.

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) पक्षाच्या महिला शहराध्यक्षा लावण्या शिंदे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पक्षाच्या दोन गटांमध्ये भांडण लावणे, चिथावणीखोर व बदनामीकारक वक्तव्य करणे अशा कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पक्षाच्या दोन गटांमध्ये भांडण लावणे, चिथावणीखोर व बदनामीकारक वक्तव्य करणे, अशा कलमांनुसार प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे जास्त आहेत. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT