मंचर : “शरद सहकारी बँकेची स्थापना सहकार महर्षी माजी आमदार (स्व) दत्तात्रय वळसे पाटील यांनी ५० वर्षांपूर्वी केली. अनेक अडचणींवर बँकेने मात केली आहे.आतापर्यंत कधीही वळसे पाटील कुटुंबातील व्यक्ती अध्यक्ष झाला नाही. कार्यकर्त्यांना अध्यक्ष पदाची संधी दिली आहे. दर महिन्याला बँकेच्या कामकाजाचा आढावा मी घेतो.
बँकेची प्रगतीकडे दममदारपणे वाटचाल सुरू आहे. अजिबात काळजी करू नका, शरद बँकेत सर्व पैसा सुरक्षित आहे.” असा विश्वास राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी (ता.१७) शरद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील.
बाळासाहेब बेंडे, विष्णू हिंगे, अँड प्रदीप वळसे पाटील, संचालक पांडुरंग पवार, दत्ता थोरात, ,अशोक आदक, किसान सैद, सुदाम काळे, जयसिंग थोरात, अजय घुले, संतोष धुमाळ, प्रदीप आमुंडकर, दौलत लोखंडे, मारुती लोहकरे, सुषमा शिंदे, रुपाली झोडगे उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले “यापुढे शरद बँकेसह सर्वच सहकारी बँका व पतसंस्थांनी सर्व प्रकारच्या खर्चात काटकसर केली पाहिजे. बँकेला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी कार्यक्षम व प्रशिक्षित पाहिजेत. सभासदांच्या ठेवी वाढवा. जे कर्जदार व्यवस्थित हप्ता भरू शकतात त्यांनाच कर्ज द्या.”
शहा म्हणाले “राजकारण बाजूला ठेऊन सहकारात काम करावे. अशी शिकवण दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील संस्थापक असलेल्या भैरवनाथ पतसंस्थेचा मी अध्यक्ष होतो. राजकीय घडामोडीनंतर मी राजीनामा दिला पण पतसंस्थेविषयी कधीही ब्र शब्द बोललो नाही.वेळोवेळी पतसंस्थेला मदतीचे धोरण ठेवले आहे..”
मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना काकडे व व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख व सुनील दनाईत यांनी अहवाल वाचन व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जे.एल वाबळे, देवदत्त निकम, दादाभाऊ पोखरकर, किसनराव उंडे, रमेश खिलारी, बाळासाहेब बाणखेले, राजू इनामदार, संतोष बाणखेले आदींनी चर्चेत भाग घेतला. निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन व शिवाजीराव लोंढे यांनी आभार मानले.
“शरद बँकेकडे सध्या एक हजार ५०० कोटी रुपये ठेवी आहेत. २०२७ पर्यंत पाच हजार कोटी रुपये ठेवी होतील. ९८९ कोटी ६० लाख रुपये कर्ज वाटप केले आहे.निव्वळ नफा दहा कोटी दहा लाख रुपये झाला आहे. भागभांडवल ७५ कोटी रुपये आहे. सभासदांना आठ टक्क्याने लाभांश वाटप केला येईल.”
- देवेंद्र शहा, अध्यक्ष शरद बँक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.