जेजुरी : शासन आपल्या दारी उपक्रमाची सभा आज जेजुरीत पार पडत आहे. यामध्ये राज्यातील महायुतीच्या सरकारनं काय काम केली आहेत, याची माहिती जनतेला दिली जात आहे.
जेजुरीतल्या सभेत पुरंदरसह परिसरातील विकास कामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं जनतेसमोर त्यांनी आपली स्पष्टचं भूमिका मांडली. (Shashan Aplya Dari in Jejuri Ajit Pawar clear his stand on development of region)
अजित पवार म्हणाले, "काहीजण म्हणतात इथं विमानतळ झालं पाहिजे, काहीजण म्हणतात पुढं झालं पाहिजे. ज्यांच्या गावात विमातनळामुळं अडचणी येतात त्यांना वाटतं आमच्या पिढ्यानं पिढ्या आमचं गाव वसलेलं आहे आम्ही का उठायचं. परंतू एक गोष्ट लक्षात घ्या मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. (Latest Marathi News)
विमानतळ करत असताना, हायवे करत असताना, शहर वाढवत असताना, धरणं वाढवत असताना, धरणं करत असताना, कॅनॉल, शिक्षण संस्था आणि जे काही समाजाचं भलं करायचं असतं तेव्हा ते कोणीही हवेत उभं करु शकत नाही. त्यासाठी जमिनीची गरज असते. जमीन मर्यादित आहे, तिला चांगला मोबादला देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत." (Marathi Tajya Batmya)
फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाकरता पहिल्यांदा त्या लोकांचा विरोध होता. एकनाथ शिंदे यांच्याकडंच तो विभाग होता. पण लोकांना योग्य पद्धतीचा मोबदला मिळाला म्हणून लोकांनी समाधानानं जमिनी दिल्या.
जेजुरीत देखील कोणाच्या तरी जमिनी घेतल्या म्हणून एमआयडीसी आली. अनेक ठिकाणची यासाठी नावं घेता येतील. यासाठी कुठेतरी मागे पुढे सरकावं लागतं.
मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं लाभार्थ्यांनो, नागरिकांनो मी तुम्हाला सांगतो की हे सरकार विकास करत असताना कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना योग्य पद्धतीनं मदत करण्याची आमची भूमिका राहिलं. याच पद्धतीनं आम्हाला पुढे जायचं आहे, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.