shriya lavande  sakal
पुणे

Shriya Lavande: इच्छाशक्तीच्या जोरावर सायकल प्रवास करीत केली इच्छा पूर्ण..

Many things can be achieved if the will is supported by effort: जेजुरी, मोरगाव, अष्टविनायक अशा अनेक सायकल मोहिमा फत्ते.

सकाळ वृत्तसेवा

Shriya lavande: इच्छाशक्तीला प्रयत्नांची साथ असेल तर अनेक गोष्टी साध्य करता येतात. अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर एका युवतीने पुणे ते पंढरपूर सायकल प्रवास करत सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेत आपला इच्छा पूर्ण केली आहे. श्रिया संगीता हनुमंत लवांडे असे या मुलीचे नाव आहे. या मोहिमेबद्दल तिचे कौतुक होत आहे.

बोरीपार्धी (ता. दौंड) येथील लवांडे कुटुंब सध्या सिंहगड रोड येथे राहत आहे. श्रियाने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून नुकतेच बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केले आहे. महाविद्यालयात एनसीसीची छात्र असल्याने तीला धाडसीपणा नवीन नव्हता. अॅथलेटस व मॅरेथॅानमध्ये ती भाग घेत असते. श्रियाला सायकलिंगची भारी हौस आहे. तीने यापूर्वी जेजुरी, मोरगाव, अष्टविनायक अशा सायकल मोहिमा पार केल्या आहेत. तीला सायकलवरून पंढरपूरला जाण्याची इच्छा होती. ती तीने नुकतीच पुरी केली आहे.

पेडलवारी ग्रुप बरोबर 250 किलोमीटरचे अंतर कापत ती पंढरपूरला दोन दिवसांत पोचली. या मोहिमेवर जाण्या अगोदर तीने सराव करत डायटवर लक्ष केंद्रित केले. खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच सिंहगड रोड भागात असताना त्यांनी श्रियाची भेट घेतली. मोहिमेबद्दल माहिती घेत त्यांनी श्रियाचे कौतुक केले.

विविध क्षेत्रात मुलांइतक्याच मुली पण पुढे येऊ लागल्या आहेत. त्यांना फक्त प्रोत्साहनाची गरज असते. संधी मिळाली की त्या पण चमकतात. मी श्रियाला सतत प्रोत्साहन देत असते. मला तीचा अभिमान आहे. जिद्दीच्या जोरावर तिने ही कामगिरी केली आहे.

- संगीता लवांडे, श्रियाची आई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT