chakan sakal
पुणे

Pune : शेलपिंपळगाव चा भीमा नदीवरील पूल धोकादायक ; पुलाला झाली पन्नास वर्षे

या पुलाला दोन-तीन ठिकाणी तडेही गेलेले आहेत. या पुलाचे संबंधित विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. या पुलावरून दररोज पन्नास हजार अवजड वाहने जातात.त्यामुळे हा पूल धोकादायक झालेला आहे.

हरिदास कड

चाकण : चाकण- शिक्रापूर मार्गावरील शेलपिंपळगाव ता. खेड येथील भीमानदीवरील पुल हा पन्नास वर्षाचा झाला आहे. या पुलाला दोन-तीन ठिकाणी तडेही गेलेले आहेत. या पुलाचे संबंधित विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. या पुलावरून दररोज पन्नास हजार अवजड वाहने जातात.त्यामुळे हा पूल धोकादायक झालेला आहे. पुलाच्या क्षमतेपेक्षा या पुलावरून अधिक वजनाची वाहने जातात.या पुलाला नवीन पर्यायी पुल उभारण्यात यावा. अशी मागणी नागरिकांची, उद्योजकांची आहे.

शेलपिंपळगाव ता. खेड येथील भीमा नदीवरील पूल हा पन्नास वर्षांपूर्वी उभारण्यात आला.हा पुल उभारण्यासाठी शासनाकडे त्यावेळी तत्कालीन स्व. मोहिते गुरुजी यांनी उपोषण आदी करून पुल उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता असे सांगितले जाते. भीमा नदीवर पूर्ण होता त्यावेळेस चाकण शिक्रापूर व परिसरातील वाहतूक विशेषतः प्रवाशांची नावेतून होत होती. शिक्रापूरला जाणारी वाहने, एसटी बस,शेलपिंपळगाव येथून शिक्रापूर ला जायची.

शेलगांवहून वाहने, एसटी बस चाकण कडे यायची.असा हा त्यावेळी प्रवास होता.हा पुल उभारल्यानंतर दळणवळणाची सेवा जलद झाली.शिक्रापूर, नगर,मराठवाडा, तसेच मुंबई,तळेगाव, चाकण परिसराला जोडणारा हा चाकण -शिक्रापूर रस्त्यावरील महत्वाचा पुल आहे.चाकण,तळेगाव, (मावळ) शिरूर,रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सर्व अवजड वाहनांची वाहतूक नगर,मराठवाडा, मुंबईकडे जाणारी पुणे -नाशिक कडे जाणारी मोठ्या प्रमाणात या पुलावरून होते.

ज्यावेळेस हा पूल बांधला त्यावेळेस हा पूल अवजड वाहनांसाठी असेल असे निश्चित केलेले नव्हते. पुलाची रुंदी ही फक्त पंचवीस फूट आहे. हा पुल तीस ते पस्तीस फूट उंचीचा आहे.या पुलाच्या मोऱ्या दगडी बांधकामातील आहे तसेच या पुलाला चौदा गाळे आहेत.या पुलावरून अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर, टँकर, बस, मालवाहू ट्रक मोठया प्रमाणात ये -जा करत असल्याने हा पुल मोठया वर्दळीचा आहे. या पुलाजवळ भीमा,भीमा नदींचा संगम होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीमा नदीतून पाणी येथे वाहते.

या पुलाची उंची अधिक असली तरी या पुलावरून पाच वेळा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले आहे त्यामुळे या पुलाला इजा पोहोचली आहे. पुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सातत्याने होते . शेल पिंपळगाव पुल हा वाहतुकीसाठी अरुंद आहे. या अरुंद पुलामुळे पुलावरून वाहतूक सुरळीत होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने या पुलावर होते. या परिसरात अगदी दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात . त्यामुळे प्रवाशी,वाहनचालक, नागरिक संताप व्यक्त करत आहेत. या पुलाला पर्यायी पुल कधी होणार असा सवाल संतप्त नागरिकांचा आहे. या पुलावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले आहेत. या पुलावरून ट्रक, टेम्पो अगदी नदीपात्रात पडलेले आहेत त्यामुळे अपघात होऊन गेल्या पाच वर्षात दहा जणांचे मृत्यू झालेले आहेत.

चाकण -शिक्रापूर मार्ग हा अतिशय अरुंद असा मार्ग आहे.चाकण औद्योगिक वसाहत तसेच नगर,मराठवाड्याची,मुंबईची मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून जाते. हा मार्ग अरुंद झाला आहे.या मार्गाच्या कडेला काही लोकांनी पत्र्याची शेड मोठ्या प्रमाणात टाकली असल्यामुळे दुकानदारी व्यवसायामुळे हा मार्ग काही लोकांनी अरुंद करून टाकलेला आहे.चाकण,मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे,भोसे शेलगाव, शेलपिंपळगाव या परिसरात अगदी पत्र्याची शेड रस्त्याच्या कडेला टाकून दुकाने,व्यावसायिक गाळे निर्माण केलेली आहेत व त्यातून मोठ्या प्रमाणात भाडे कमवण्याचा काही लोकांचा धंदा आहे.

रस्त्याच्या कडेला अगदी खेटून दुकाने, व्यावसायिक गाळे टाकल्यामुळे त्याची वर्दळ रस्त्यावर होत आहे व अतिक्रमण झाले आहे. या मार्गाच्या दुरावस्थेला जबाबदार काही लोक या मार्गाच्या कामाकडे काही लक्ष देत नाही असाही आरोप नागरिकांचा आहे. भीमा नदीवरील पूल काही दिवसात पन्नाशी पार करणार आहे.या पुलाची दिवसेंदिवस दुरावस्था होत आहे.अवजड वाहनांची मोठी वर्दळ या पुलावरून होत आहे.हा पुल दगडी बांधकामाचा असल्याने त्याला काही ठिकाणी तडे गेल्याने तो धोकादायक आहे.या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांची, प्रवाशांची आहे. या पुलाचे काही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. पुलाचे लोखंडी संरक्षण कठडे तुटलेले आहेत. या मार्गाचे लवकर काम व्हावे अशी मागणी शिंदे शिवसेनेचे प्रकाश वाडेकर, उद्धव ठाकरे शिवसेनेचे अशोक खांडेभराड, रामहरी आवटे, सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ लांडे व इतरांनी केली आहे.

या पुलाच्या सुरुवातीला चाकण बाजूकडून येताना शेलगाव फाटा तसेच वडगाव फाटा आहे तिथे वाहने वळताना आळंदी कडे जाताना तसेच चाकण,शेलपिंपळगावकडे जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच शेल पिंपळगावाजवळ शेलपिंपळगाव गावातून वाहने रस्त्यावर येताना तसेच दौंडकरवाडी मार्गाकडे वाहने जाताना वाहतूक कोंडी होते. या मार्गावर वाहतूक विभागाचे पोलीस क्वचित असतात. त्यामुळे येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी सातत्याने असले पाहिजेत अशी नागरिकांची मागणी आहे.या मार्गाचे काम होणार निविदा निघल्या असे अनेक वेळा सांगितले जाते. परंतु ही नुसती आश्वासने आहेत असा नागरिकांचा आरोप आहे. हा मार्ग यमराज मार्ग असून प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा झालेला आहे. या मार्गाचे लवकर काम करावे. या मार्गाच्या कामासाठी या मार्गाचा दशक्रिया विधी यापूर्वी केलेला होता. असे सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ लांडे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभागाचे उपअभियंता राहुल कदम यांनी सांगितले की, " या मार्गाचे हस्तांतरण (एनएचएआय )राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे झालेले आहे.पुलाला काही ठिकाणी तडे पडले आहेत अशी जर परिस्थिती असेल तर त्याबाबत त्यांना माहिती देण्यात येईल.मी या मार्गाची व पुलाची पाहणी करणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT