पुणे

शिक्रापूरकरांचा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा अनोखा फंडा

भरत पचंगे

शिक्रापूर : मागील वेळी (२०१५ ला) तब्बल दहा हजारांच्या मतांच्या दराने गाजलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीला यावेळी बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्व गावकारभा-यांनी घेतला आणि त्याला ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या साक्षीने यश आले.

अर्थात हा निर्णयही अनोखा ठरला तो अशासाठी की, यावेळी हरलेल्या सर्व १७ ही उमेदवारांना यावेळी थेट ग्रामपंचायतीत सदस्यपदाची खुर्ची देण्याचे ठरले. तालुका, जिल्ह्यासाठीच नव्हे तर हा निर्णय आता राज्यासाठी आदर्श ठरावा असा झाला.  

जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढालीसाठी प्रसिध्द राहिलेली शिक्रापूर ग्रामपंचायत यावेळी चक्क बिनविरोध करण्याच्या दिशेने निघाली आहे.  गावातील सर्वच मान्यवर नेतेमंडळींनी आज (ता.२९) ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या साक्षीने मागील वेळी (सन २०१५) निवडणूकीत जे उमेदवार दूस-या क्रमांकाने पडले. त्याच सर्व १७ जणांना यावेळी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी नियुक्त करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. विशेष म्हणजे सर्वच नेते मंडळींनी आपले वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवून हा निर्णय घेतल्याने शिक्रापूर ग्रामस्थांनी संपूर्ण तालुका नव्हे तर जिह्यासाठी हा एकमुखी बिनविरोध निवडणूकीचा निर्णय आदर्श म्हणून ठेवला आहे.

एका मताला दहा हजार रुपये असा रेट (दर) मागील निवडणूकीत काही वार्डांमध्ये निघाला होता व दोन्ही बाजुंनी तसे पैसेही वाटले गेल्याचे सर्वश्रुत होते. पर्यायाने यावेळीही तितक्याच जोमाने निवडणूक होणार व पैशांची उधळण होणार असा होरा गावातील सर्वच स्तरांवर होता. मात्र गावातील सर्वात जेष्ठ माजी सरपंच आबासाहेब करंजे-पाटील, बापूसाहेब जकाते तसेच तालुका-जिल्ह्याच्या राजकारणात असलेले माजी सभापती मंगलदास बांदल, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, घोडगंगाचे माजी संचालक अरुण करंजे-पाटील, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सोमनाथ भुजबळ, पोलिस पाटील मोहनशेठ विरोळे, पुणे बाजार समिती संचालक बाळासाहेब चव्हाण, रमेश थोरात, पंढरीनाथ राऊत तसेच गावातील सर्व प्रमुख गावकारभारी आज ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरात एकत्र आली आणि वरील प्रमाणे निर्णय घेतल्याची माहिती समता परिषदेचे विभागिय अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, माजी सरपंच रामभाऊ सासवडे आदींनी दिली.

दरम्यान भरलेले फॉर्म मागे घेण्याच्या दिवशीही पुन्हा हे सर्व गावकारभारी एकत्र येतील आणि सर्वच सहाही वार्डात निवडणूकीत कुणी उभे राहणार नाही याची दक्षता घेतील. तरीही कुणीही इच्छुकाने गावहित डावलून परस्पर आपला अर्ज ठेवल्यास त्याच्या विरोधात सर्व गाव म्हणून निवडणूक लढविली जाईल असेही यावेळी ठरले गेले. या शिवाय सरपंचपदाचे आरक्षण जसे पडेल तसे पुन्हा सर्व गावकारभारी एकत्र बसतील आणि सरपंच-उपसरपंचांचा निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले. अर्थात हे सर्व ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या साक्षीने झाले. 

पैसे गाववाल्यांनी वाटायचे...शिक्रापूरात एकुण मतदान १४ हजार २२५ आहे. यातील ३० टक्के मुळ शिक्रापूरकर तर उर्वरित ७० टक्के बाहेरगावचे रहिवासी शिक्रापूरचे मतदार आहेत. स्थानिक पातळीवर मतदानासाठी पैसे हे स्थानिकांना नाही तर बाहेरच्या मतदारांना वाटावे लागतात. यात फक्त मुळ ग्रामस्थांचाच तोटा असल्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत बोलले गेले आणि गावासाठी चांगला तर पैशांसाठी चटावलेल्या मतदारांसाठी हिरमोड करणारा निर्णय ठरला आणि बैठकीनंतर एकच जल्लोष करीत अनपेक्षित निर्णय जाहिर झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT