Davman Nandurya Bullock Sakal
पुणे

Aalephata News : शिरोली बोरी येथील शेतक-याने घातली आपल्या बैलाची दशक्रिया

शिरोली बोरी (ता. जुन्नर) येथील‌ प्रसिद्ध गाडामालक कै. गंगाराम कोंडाजी खिल्लारी यांच्या देवमन या बैलाचा मृत्यू ३ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला.

सकाळ वृत्तसेवा

आळेफाटा - शिरोली बोरी (ता. जुन्नर) येथील‌ प्रसिद्ध गाडामालक कै. गंगाराम कोंडाजी खिल्लारी यांच्या देवमन या बैलाचा मृत्यू ३ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरी झाला. त्याच्या उपकरातून उतराई म्हणुन खिल्लारी कुटुबियांनी दिनांक १२ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी दशक्रिया विधी केला.

त्यानिमित्ताने शिवनेर भूषण ह. भ. प. तुळशीराम महाराज सरकटे यांचे प्रवचन झाले. व ज्याप्रमाणे माणसांच्या दशक्रियेला विधी करतात त्याचप्रमाणे या बैलाची विधिवत कार्यक्रम पार पडला. बैलाची आठवण कायम राहावी म्हणून घरासमोर हुबेहूब बैलाचा पुतळा उभा केला. त्यांच्या कुटुंबयांचे बैलाबद्धल असणारे प्रेम, जिव्हाळा हा अतूट होता. तसेच कुटुंबांनी दाखवलेल्या बैलाबद्दल प्रेमाची पंचक्रोशीत चर्चा चालू आहे.

गेल्या २१ वर्षांपासून कुटुंबाचा एक सदस्य म्हणुन या देवमन बैलाकडे पहात होते. प्रसिद्ध गाडामालक नामदेव खिल्लारी, देवराम खिल्लारी यांना नंदू डावखर यांनी देवमन हा २ वर्षाचा असताना सन २००२ साली नांदूर पठार गावचे शेतकरी शांताराम आहेर यांकडून खरेदी करून दिला होता. त्यावेळी त्याचे वय दोन वर्षे होता तेव्हापासुन त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाप्रमाने त्याचा २१ वर्ष सांभाळ केला.

आजी कै. धोंडाबाई स्व:ता देवमन यात्रेला जाण्यापूर्वी आणि आल्यानंतर त्याची दृष्टही काढत असतं. त्याची बैलगाडा स्पर्धेत पळण्याची पद्धत ही खूप आकर्षक होती. पायांमध्ये अंगार, अणि नजरेत तलवारीची धार होती. त्याने साकोरी, खडकी, पिंपळगाव, मंचर, घोडेगाव, चऱ्होली, थापलिंग, वडगाव अशा अनेक मोठी धावपट्टी असणाऱ्या घाटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला, त्याने कायम प्रथम क्रमांकात बारी ठेवली.

देवमन हा बारीचा हुकमी एक्का होता. त्याच्या आकर्षक आणि वेगवान गतीने तो नेहमी प्रेक्षकांच्या मनात बसायचा. कमी कालावधीत तो खूप लोकप्रिय झाला होता. नांदुऱ्या घाटात येणार समजल्यावर पंचक्रोशितली अनेक गाडामालक, गाडाशौकीन त्याची बारी पाहायला आवर्जून येत असतं आणि मनापासून त्याचे कौतुक देखील करत. त्यावेळी त्याला अनेक नामंकित गाडामालकानी मोठ्या रक्कमेला मागणी केली.

परंतु तो खिल्लारी कुटुंबांनी विकला नाही. गाडा बंदीचा जास्त काळ गेला त्यामध्ये देवमन एकदम उतारवयात आला आणि शेवटी त्याचे शरीर वयाप्रमाणे पूर्ण थकले. कुटुंबाने त्याचा पूर्णपणे सांभाळ केला. देवमनची आठवण म्हणून कुटुंबीयांनी घरासमोर पुतळा बसवला असुन याच्या दशक्रिया च्या निमित्ताने जुन्नर, आंबेगाव, पारनेर, शिरूर, संगमनेर, खेड तालुक्यातुन मोठ्या प्रमाणावर गाडामालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT