ajit pawar sakal
पुणे

Ajit Pawar : कोल्हेंना तिकीट दिलं ही माझी राजकीय जीवनातली चूक

सकाळ वृत्तसेवा

ओतूर - मागील वेळी कोल्हेंना तिकीट दिलं ही माझी राजकीय जीवनातली चूक होती, ती चूक सुधारण्यासाठी मी आलोय, आता बिनकामाचा माणूस नाही तर कामाचा माणूस, अनुभवी हक्काचा माणूस म्हणून शिवाजीराव आढळराव यांना लोकसभेत पाठवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ओतूर, ता. जुन्नर येथे महायुतीचे लोकसभेचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. कोल्हेंना नट म्हणून, अभिनेता म्हणून चित्रपट, मालिकेत रस होता, पण पाच वर्षे कारभार काय केला, हा माणूस आदीवासी भागात आला नाही, की कोणाची कामं केली नाहीत, त्याला तिकीट देऊन माझी चूक झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

ही निवडणूक पुढच्या पीढीचं भविषय ठरवणारी आहे, त्यामुळे भावनिक होऊ नका, विकासकामांसाठी नवीन सरकारमध्ये जाण्याची आम्ही शरद पवारांना विनंती केली, वयस्कर झाल्यावर तेच म्हणाले राजीनामा देतो, आणि दोन दिवसांनी म्हणतात नाही देत. शरद पवार जे म्हणाले ते आम्ही ऐकलं ना, पण किती दिवस ऐकायचं, असे सांगून तुमच्या मुलाबाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही महायुतीसोबत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विधान परिषदेचे गटनेते भाजप आमदार प्रवीण दरेकर, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजप नेत्या आशाताई बुचके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश लांडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जुन्नर बाजार समिती सभापती ॲड. संजय काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष समद इनामदार, तालुकाध्यक्ष पांडूरंग पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, माजी उपाध्यक्ष अरुण गीरे, गणपत फुलवडे, माजी आरोग्य सभापती मंगलदास बांदल, माजी जि. प. सदस्य भानुविलास गाढवे, बबन तांबे, भाऊ देवाडे, शरद बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक तांबे, अभिजित शेरकर, कृषीउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप डुंबरे, मनसे तालुकाध्यक्ष तान्हाजी तांबे, गणेश कवडे, उज्वला शेवाळे, ओतूर सरपंच छाया तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, दत्ता गवारी तसेच महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आढळराव म्हणाले की, कोल्हेंनी पाच वर्षे काही काम केले नाही,पण या बिनकामाच्या माणसांनं दोन तीन महिन्यात मात्र करामती केल्यात,वाट्टेल तसे बोलु लागलाय, बैलगाडा शर्यत मी सुरु केली, रेल्वे मी आणली, अशा दोन आणि तीन महिन्यात कामे होत असतात का, त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रवीण दरेकर म्हणाले की, तुमच्या कडे राहुल गांधी आमच्या कडे नरेंद्र मोदी आहेत,या दोघांची तुलना होऊ शकत नाही, मुस्लिमांचं व्हिडीओ फतवे काढून ध्रुवीकरण करायचं काम सुरु आहे, पण मुस्लिम समाजानेही आम्ही या मातीतले आहोत, विकासाचे पाईक आहोत, म्हणून आमच्या मागे रहा असे आवाहन केले. पराभव दिसू लागल्याने कोल्हेंनी रडीचा डाव सुरु केलाय, इकडे पैसे वाटले, तिकडे पैसे वाटले, असे ते म्हणू लागलेत असा आरोपही त्यंच्यावर केला.

अतुल बेनके म्हणाले की, कोल्हेंना शेतकऱ्यांचा खोटा कळवळा आहे,आम्ही अनेकदा कांद्यासाठी आंदोलने केली,पण त्यावेळी ते कधीच आले नाहीत,निवडणूक आल्यावर त्यांना कळवळा आला आहे.जरा चंदेरी दुनियेतून बाहेर या शेतकऱ्यांना जवळून जाणून घ्या असा टोलाही त्यांनी लगावला,खासदार झाल्यावर अनेक ठिकाणी कार्यक्रमांना येण्यासाठी कोल्हेंनी लाखो रुपये मागीतले,पैसे घ्यायचे आणि कुठंही नाचायचं,अशी त्यांची वृत्ती असल्याचे कोरडेही बेनके यांनी कोल्हेंवर ओढले.

शरद सोनवणे म्हणाले की, ही लढाई कोल्हे आढळराव यांची नाही तर देशाची आहे, देशाच्या भविष्यासाठी अतुल बेनके, आशाताई बुचके आणि मी एकत्र आलो आहोत.आणि आढळराव यांना निवडून आणण्यासाठीच आम्ही एकत्र आहोत असे ते म्हणाले.

आशाताई बुचके यांनी कोल्हेंना फटकारले,त्या म्हणाल्या हा व्यक्ती ग्रामपंचायत निवडणूकीत पाच वर्षात एकदाही मतदानाला आला नाही, त्यामुळे त्याला संविधानावर बोलायचा अधिकार नाही. यावेळी देवराम लांडे, मंगलदास बांदल, भानुविलास गाढवे यांनी व इतरांनी मनोगते व्यक्त केली.

गडकिल्ले संवर्धन, शिवनेरी संवर्धन, दिवसा थ्री फेज लाईट, विषमुक्त भाजीपाला क्लस्टर, कुकडेश्वर मंदिर संवर्धन, चिल्हेवाडी बंद पाईप लाईन, द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न, दुध अनुदानाचे प्रलंबित प्रश्न, बिबट्या समस्या हे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. रेल्वे रस्ते, पर्यटनासाठी केंद्राचा निधी आणावा लागणार आहे. आणि त्यासाठी पाठपुरावा करणारा माणूस म्हणून महायुतीचे उमेदवार आढळराव यांना निवडून द्या.

- अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)

रामकृष्णहरी म्हणण्याचा अधिकार नाही.

रामकृष्णहरी हा मंत्र ओतूरला चैतन्य स्वामींनी दिला.पण आता याचा वापर करून, वाजवा तुतारी असे ते प्रचार करत आहेत, मात्र चैतन्य महाराजांच्या समाधीस्थळी भरणाऱ्या यात्रेला कोल्हे पाच वर्षात एवढे श्रावणी सोमवार झाले, अनेकदा बोलावून ते एकदाही आले नाहीत, त्या मुळेच रामकृष्णहरी म्हणण्याचा कोल्हेंना अधिकार नाही, असे अतुल बेनकेंनी कोल्हेंना सुनावले.

मराठा महासंघाचा जाहीर पाठींबा

आढळरावांनी २० वर्षे जनतेशी नाळ जोडली आहे. मात्र कोल्हेंनी पाच वर्षात कोणताच विकास केला नाही. तर जातीचं राजकारण करुन,मालिकेच्या माध्यमातून महिलांची फसवणूक केली. त्यामुळे गेली २० वर्षे तळागाळातील प्रत्येकाला न्याय मिळवून देणाऱ्या आढळराव यांना आमचा जाहिर पाठींबा असल्याचे मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव लांडे यांनी यावेळी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT