sachin ahir sakal
पुणे

Sachin Ahir : आढळरावांनी लोकसभेचा दावा सोडला की काय?; सचिन अहिर यांचा खोचक सवाल

सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजी आढळराव यांना म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यांच्या पात्रतेनुसार (अनुभवानुसार) त्यांना पद मिळाले नाही.

रूपेश बुट्टेपाटील

आंबेठाण - सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजी आढळराव यांना म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यांच्या पात्रतेनुसार (अनुभवानुसार) त्यांना पद मिळाले नाही. कमी उंचीचे पद घेऊन त्यांनी लोकसभेचा दावा सोडला की काय? असा खोचक सवाल माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी केला आहे.

शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त अहिर खेड तालुक्यात आले होते, यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.

याप्रसंगी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड, शिवाजी वर्पे, तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, माजी सभापती अमोलदादा पवार, बाजार समिती संचालक सोमनाथ मुंगसे, सागर मुऱ्हे, सुरेश भोर, मंगेश पऱ्हाड, युवा सेनेचे राज्य विस्तारक विशाल ससाणे आदी उपस्थित होते.

यावेळी अहिर म्हणाले की, आढळरावांनी एवढयात समाधान का मानले? असा सवाल करीत ते आमच्याकडे असते तर त्यांना विचारून कार्यकर्त्यांना पदे दिली असती. त्यांनी हे पद स्वतःला न घेता त्यांचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, नितीन गोरे, सचिन बांगर यांच्यासाठी सुचविले असते तर बरे वाटले असते. हे पद त्यांनी स्वतःला घेऊन लोकसभेचा दावा सोडला की काय? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडला असेल.

खेड, जुन्नर विधानसभा आम्ही लढविणार असून त्यासाठी आमच्या नेतृत्वाकडे खेडची जागा मागणार आहे. आढळराव आमच्याकडे उपनेते होते तिकडे नेते झाले, तरीही त्यांना हे पद दिले आहे. नेत्यांना हे पद शोभत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आढळराव आणि गोरे कुटुंबातील काही सदस्य सुद्धा निवडणूकित जागा मिळणार नाही या उद्देशाने पक्षाबाहेर गेले आहेत. विधानसभेसाठी आमच्याकडे इच्छुक खुप आहेत तर अजून आमच्याकडे बरेच पक्ष प्रवेश होणार असून त्यात विविध गावचे सरपंच, पदाधिकारी यांचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक खांडेभराड म्हणाले, की ज्यांना लोकसभा लढवायची त्यांनी हे पद घ्यायला नको होते. त्यांना अजून चार पदे मिळाली तरी ती पदे ते घेतील. असले पद त्यांना देऊन त्यांची बोळवण केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT