Shivajirao Adhalrao Patil esakal
पुणे

..म्हणून तिसऱ्या दिवशी माझी सेनेतून हकालपट्टी केली : आढळराव पाटलांनी सांगितलं 'कारण'

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला लागलेलं खिंडार काही केल्या काही बुजायचं नाव घेत नाहीय. आमदारांपाठोपाठ आता खासदार, जिल्हाध्यक्ष आणि सामान्य कार्यकर्तेही शिंदे गटात सामील व्हायला लागलेत. पुण्यातही शिवसेनेला जबर धक्का बसलाय. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळं पुणे जिल्ह्यात शिवसेना खिळखिळी झालीय.

शिंदे गटात सामील झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राष्ट्रवादीवर (NCP) जोरदार हल्लाबोल केलाय आढळराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री आमचे असताना देखील आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आम्ही शिवसेनेसाठी रात्रंदिस झटत राहिलो. पण, आता आम्ही स्वबळावर मोठं होण्याचा निर्णय घेतलाय. आम्ही कधीच हिंदूत्वाचा विचार सोडला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आढळराव पाटील पुढं म्हणाले, सगळ्यांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं. शिरुर मतदासंघात शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल झाले. ज्यांची गरज मतदारसंघाला होती, ते मतदारसंघात कधीच नव्हेत, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांना लगावलाय. सेनेतील 40 आमदार फुटतात, त्यामुळं कुठंतरी आपण चुकतोय, कुठंतरी धोरणांमध्ये बदल व्हायला पाहिजे होता. पण ठिक आहे, तसं काही झालं नाही. नेतृत्वाला मान्य होतं म्हणून आम्ही गप्प बसलो. राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) नेमणूक झाली. माझं कर्तव्य म्हणून मी त्यांचं अभिनंदन केलं. मात्र, पक्षाला माझं 'अभिनंदन' आवडलं नाही आणि तिसऱ्या दिवशी माझी हकालपट्टी केली, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT