मंचर : शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार अतुल बेनके आमदार चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचर (ता आंबेगाव )
येथे शिवगिरी मंगल कार्यालयात मंगळवारी( ता. २६) रोजी संध्याकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेशाची जय तयारी सुरू आहे" अशी माहिती आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे पाटील यांनी दिली.
मंचर- एकलहरे (तालुका आंबेगाव )येथ) हॉटेल माऊली सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत हिंगे पाटील बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील बाणखेंले,
रवींद्र करंजखेले ,संतोष डोके ,कल्पेश बाणखेले, आंबेगाव तालुका पंचायत समिती माजी उपसभापती नंदकुमार सोनावळे, भाऊसाहेब निघोट , राम भक्ती थोरात,आदी मान्यवर उपस्थित होते.
विष्णू हिंगे म्हणाले"शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ,सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.
आढळराव पाटील हे खासदार नसतानाही गेली पाच वर्ष ते सतत जनतेत आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. पंधरा वर्षे खासदारकीचा त्यांना अनुभव आहे. त्यांनाही यापूर्वी अनेकदा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे.आढळराव पाटील व वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे.
जनतेशीं सतत संपर्क ठेवणारा नेता अशी आढळराव पाटील यांची प्रतिमा आहे. आंबेगाव तालुक्याच्या प्रत्येक गावात वाडी वस्तीवर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे आढळराव पाटील यांच्या समावेत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे .
तसेच भाजपचे कार्यकर्तेही आमच्या सोबत ताकतीने उभे राहणार आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या विचाराचा उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,
भाजप व सर्व मित्र पक्ष एकजुटीने अत्यंत प्रभावी प्राचार यंत्रणा उभी करणार आहेत. आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवार असल्याचे जाहीर झाल्यानंतर अनेक गावात कार्यकर्ते सरपंच ,
उपसरपंच, व्यावसायिक युवक युवती व महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वळसे पाटील ,आढळराव पाटील व भाजप पक्षाची एकत्रित ताकद लक्षात घेता आंबेगाव तालुक्यातून किमान एक लाखाचे मताधिक्य आढळराव पाटील यांना मिळेल असा मला विश्वास आहे."
अरुण गिरे व रवींद्र करंजखेले यांनी खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले"खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांना मदत करणे तर सोडाच पणअनेक गावांचे तोंडही डॉ. कोल्हे यांनी पाहिले नाही.
त्यांचा मोठ्या प्रमाणात खासदार निधी खर्च न झाल्याने मागे गेला आहे. निमंत्रण देऊनही अनेक कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारली आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त आहे असा ते निरोप देत होते. येथील जनतेने त्यांना शूटिंगच्या कामासाठी पाठवले नव्हते.
याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. आढळराव पाटील गेली पाच वर्ष सतत मतदारसंघ राज्य सरकार व केंद्र सरकार बरोबर संपर्कात आहेत. त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत. आढळराव पाटील यांच्या समवेत सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
एकजुटीने प्राचार् यंत्रना राबवून आढळराव पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील. कारण खासदार नसतानाही आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे हे सर्वश्रुत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.