Sharad Pawar sakal
पुणे

Sharad Pawar: विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी शिवनगर संस्था ठरतेय यशस्वी; शरद पवारांचे प्रतिपादन

Malegaon: खासदार सुप्रिया सुळे यांनीही संस्थेला परिपुर्ण करण्यासाठी मीही वर्षात १२ दिवस (प्रतिमहिना १ दिवस ) या संस्थेत कार्य़रत राहू इच्छिते असे सांगितले

कल्याण पाचांगणे : सकाळ वृत्तसेवा

कल्याण पाचांगणे, सकाळ वृत्तसेवा

माळेगाव, ता.६ ः कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञाच्या युगात विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य व योग्य करिअरसाठी पुरिपुर्ण मार्गदर्शन व्हावे, नव्या संधीची माहिती विद्यार्थांना मिळावी या उद्देशानेच शिवनगर विद्या प्रसारक मंडळ ही संस्था काम करत आहे. त्यानुसार संस्था प्रशासनासह प्राध्यापकांनी यापुढे अद्ययावर ज्ञान घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सध्याचे बदलते शैक्षणिक धोरण स्वीकारावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते व शिवनगर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. यावेळी शिवनगरच्या विश्वस्त व खासदार सुप्रिया सुळे यांनीही संस्थेला परिपुर्ण करण्यासाठी मीही वर्षात १२ दिवस (प्रतिमहिना १ दिवस ) या संस्थेत कार्य़रत राहू इच्छिते असे सांगितले. सुळेंच्या या भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

माळेगाव (ता.बारामती) येथे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचा वार्षिक कामकाजाचा आढवा देणे, संस्थेच्या विश्वस्त सुप्रिया सुळे यांची खासदारपदी निवड झाल्याच्या प्रित्यर्थ सत्कार समारंभात आज संस्थेचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी शिवनगरचे उपाध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, सचिव डाॅ. धनंजय ठोंबरे, माजी उपाध्यक्ष रंजन तावरे, अनिल तावरे, रामदास आटोळे, अनिल जगताप, वसंतराव तावरे, गणपत देवकाते, रविंद्र थोरात, महेंद्र तावरे, सिमा जाधव, चैत्राली गावडे आदी प्राध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे यांना तुम्ही चार वेळा खासदार करून पार्लमेंटमध्ये पाठवविले. अर्थात तिचे उत्तम काम विचारा घेवून तुम्ही हा निर्णय घेतला, असे सांगून पवार म्हणाले,`` निवडणूक झाली आता कामाला लागले पाहिजे. पार्लमेंटमध्ये सुप्रियाची हाजेरी ९८ टक्के असते आणि माझी ६० टक्केपर्यंत पोचते. लोकशाहीमध्ये हे सर्वोच्च सभागृह लोकांच्या कल्याणाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. शेती,शिक्षण, आरोग्य आणि आद्योगिक क्षेत्रात अधिक बळकटी कशी येईल, लोकांचे प्रपंच कसे पुढे येतीय यासाठी तेथे राजकारण विरहीत काम केले जाते. केंद्राकडे उसाची, साखरेची किंमत वाढविण्यासाठी पाठपुरवा होत आहे. त्यामध्ये हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्हीही प्रयत्नशिल आहे.``

कै. यशवंतराव चव्हाण यांच्यासह अनेक नेतेमेंडळींनी सहकार व शैक्षणिक चळवळ उभारली, याची आठवण करून देत खासदार सुळे म्हणाल्या,`` सर्व घटकांमध्ये समानता आणण्यासाठी विशेषतः यापुढे अद्ययावत शिक्षणाला अधिक महत्व आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) प्रणालीचा यापुढे बोलबाला आहे. हे जरी खरे असले तरी शिक्षण क्षेत्रात या प्रणालीचा किती व कसा उपयोग होईल यात शंका आहे. शिक्षक प्राध्यापक जेवढा आत्मियतेने आणि अपुलकीने विद्यार्थ्याना ज्ञानदान करतो, तेवढा विश्वास कोणत्याही प्रणालीत असू शकत नाही. त्यामुळे या पुढील काळात स्पर्धेत टिकण्यासाठी सुरवातीला प्राध्यापकांनी अपग्रेड झाले पाहिजे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.`` पारंपारिक शिक्षणाच्या विविध पर्य़ायांसोबत हाॅटेल मॅनेजमेंट, वैमानिक प्रशिक्षण यासारख्या काही वेगळ्या विषयांवरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे सुळे यांनी सांगितले. तत्पुर्वी उपाध्यक्ष केशवराव जगताप, सचिव डाॅ. ठोंबरे यांनी संस्थेच्या कार्य़ाचा आढावा उपस्थितांपुढे मांडला. कार्य़क्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले, तर आभार व्ही.एस.पवार यांनी मानले.

....

चौकट ः...आता कौशल्य आधिरित अभ्यासक्रमावर भर

पारंपारीक शिक्षणाबरोबर आता कौशल्य आधिरित अभ्यासक्रमावर भर देणे, टिचींग स्टाफला अपग्रेड करणे, अतिरिक्त ठरलेल्या टिचींग स्टाफला इतर कोर्सेचा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी प्रवृत्त करणे, नोकरभरतीमध्ये पारदर्शकता आणणे अशा सुचना शिवनगर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा बैठकीत शिवनगरच्या प्रशासनाला दिल्या. यावेळी सचिव म्हणून कार्य़भार हाती घेतलेले डाॅ. धनंजय ठोंबरे यांच्या चांगल्या कार्य़पद्धतीचे पवार यांच्याकडून कौतूक झाले.

छायाचित्र ः माळेगाव (ता.बारामती)ः येथे शिवनगर संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचा सन्मान करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : 'परिवर्तन महाशक्ती'च्या आणखी २८ जागांची निश्चिती; स्वराज्य पक्ष, प्रहार पक्ष आजच आपल्या उमेदवारांच्या नावाची करणार घोषणा

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT