पुणे : पुणे महापालिकेच्या जम्बो कोवीड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना सोमय्या खाली पडले. सोमय्या यांच्या गाडीचा पाठलाग करत त्यांना महापालिकेतून हुसकावून लावून देण्यात आले. या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे प्रचंड खळबळ उडाली. याचे राजकीय पडसाद ही उमटण्याची शक्यता आहे.(Video of Kirit Somaiya Attacked by Shiv Sena Supporters)
किरीट सोमय्या सायंकाळी साडे चारच्या सुमारास महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार (Vikram Kumar ) यांना निवेदन देण्यासाठी येणार होते याची कुणकुण शिवसैनिकांना लागतात. सुमारे १०० शिवसैनिक महापालिकेत काही काळ आधी उपस्थित राहिले. सोमय्या हे नवीन प्रशासकीय इमारतीतील गेटने महापालिकेत येणार असल्याची माहिती शिवसैनिकांना मिळाली. त्यामुळे शिवसैनिक घोषणाबाजी करत नवीन इमारतीकडे गेले. त्यानंतर सोमय्या यांची गाडी जुन्या इमारतीच्या दिशेने आली.
सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना तीन-चार शिवसैनिकांनी त्यांना अडवले "तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाहीत, सेलेक्टिव्ह प्रकरणावर काय चर्चा करता" असा जाब विचारला. त्यावर सोमय्या यांनी "मला माहिती द्या मी त्याबद्दल ही प्रशासनाशी बोलतो" असे सांगितले. त्याच वेळी नव्या प्रशासकीय इमारती कडून शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्या कडे आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये प्रयत्न केला. पण आक्रमक झालेले शिवसैनिक तुटून पडले सोमय्या यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेताच सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसविले घोषणाबाजी व धक्काबुक्की मुळे याठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला.
सोमय्या यांना गाडीत बसू देण्यासही शिवसैनिकांनी विरोध केला. त्यांच्या सुरक्षारक्षकांना ही धक्काबुक्की करण्यात आली. कशीबशी सोमय्या यांची गाडी महापालिकेतून बाहेर जात असताना शिवसैनिकांनी जोरात काचेवर, बॉनेटवर हाताने मारून गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. बाहेर जातानाच्या गेटवर काही काळ त्यांची गाडी थांबविण्यात आली मात्र सुरक्षारक्षकांनी वाट रिकामी करून सोमय्या यांना महापालिकेतून बाहेर काढले.
शिवसैनिकांकडून आक्रमक आंदोलन केल्याने महापालिकेत तणावाची स्थिती निर्माण झाली सोमय्या गेल्यानंतरही काहीकाळ शिवसैनिकांनी महापालिकेचा समोर जोरदार घोषणाबाजी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.